क्रॉसिंगची कटकट मिटणार,110 किमीचा “सुपरफास्ट’ वेग आता फक्त 16किमी दूर:अकोळनेर-निंबळक हायस्पीड चाचणी यशस्वी; 30 मे रोजी अंतिम चाचणी

0
orig_new-project-2026-05-19t080817114_1779158355.jpg


.

अहिल्यानगर-दौंड रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे “सुपरफास्ट’ स्वप्न आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मार्गावरील गाड्यांचा ११० ते १३० किलोमीटरचा वेग आता अहिल्यानगरपासून अवघा १६ किलोमीटर दूर आहे. अहिल्यानगर-दौंड दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अकोळनेर ते निंबळक या १८.२१ किलोमीटर अंतरावरील पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी सोमवारी (१८ मे) ताशी १३० किमी वेगाने यशस्वीरीत्या पार पडली. या यशानंतर आता केवळ “विसापूर ते सारोळा’ या १६ किलोमीटर अंतराची अंतिम (सहावी) चाचणी बाकी राहिली आहे. ती पूर्ण होताच विनाकारण रेल्वे थांब्यांची आणि क्रॉसिंगची कटकट कायमची मोडीत निघणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, विदर्भासह गोवा, कर्नाटक आणि जम्मूकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवास कमालीचा वेगवान होणार आहे.

गेल्या ८ वर्षांपासून सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यापूर्वी नगर-मनमाड मार्गावरील विविध टप्प्यांच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, एकूण १८४ किलोमीटर दुहेरी रेल्वे लाईन मार्गाची तपासणी पूर्ण झाली आहे. सोमवारच्या चाचणीत ट्रॅकची क्षमता, उर्वरित पान ४

४ राज्यांना जोडणारा वेगवान कॉरिडोअर! मनमाड-दौंड मार्गावर अहिल्यानगर हे भौगोलिक, व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून येथे एकेरी रेल्वे लाईनची मर्यादा असल्यामुळे गाड्यांचा वेग कमालीचा मर्यादित राहत होता. एखादी गाडी क्रॉसिंगवर असेल.

सुपरफास्ट सेवांचा लाभ ^ अकोळनेर ते निंबळक दुहेरी रेल्वे मार्गावर पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी १०० टक्के यशस्वी झाली आहे. या प्रकल्पामुळे नगरच्या रेल्वे प्रवासात ऐतिहासिक बदल होणार असून, आगामी काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुपरफास्ट सेवांचा लाभ मिळेल. – सागर चौधरी, उपमुख्य अभियंता , रेल्वे विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed