निमगाव वाघात रंगली साहित्यिक, कवी अन् शाहिरांच्या विचारांची समृद्ध मैफल:सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात‎

0
253_17790976836a0ae053657bc_mir_6001.jpg



तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वैचारिक वातावरणात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद

.

संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे आणि राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या अध्यक्षा तथा साहित्यिक प्रतिभा खैरनार, युवा कीर्तनकार ह.भ.प. दिपाली गणगे-कोकाटे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड आणि संयोजक पै. नाना डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी महापुरुषांच्या जयंती उत्सवाला विचारांची दिशा देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले. उद्घाटक ॲड. झावरे यांनी, साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्रतिभा खैरनार यांनी, ग्रामीण साहित्य संमेलन ही केवळ काव्याची मैफल नसून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी सामाजिक परिवर्तनाची चळवळ असल्याचे प्रतिपादन केले. ह.भ.प. दिपाली कोकाटे यांनी साहित्य आणि कीर्तन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. कवी संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत चाबुकस्वार व मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांच्या पोवाड्यांनी सभागृह दणाणून सोडले. कवी गीताराम नरवडे, देवीदास बुधवंत, उमेश गोरे यांनी काव्य सादरीकरण केले. सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले, तर आभार संदीप डोंगरे यांनी मानले. संमेलनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महापुरुषांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये चाँद हुसेन शेख, प्रा. गणेश भगत, अल्ताफ सय्यद, बाळासाहेब देशमुख, संदीप रासकर, सारिका उगले, मल्हारी खुडे, सुनील वाघ, नर्गिस शेख, हिरालाल बावीस्कर, गोकुळ बोरसे, रामचंद्र लोखंडे आणि अशोक भालके यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा “राज्यस्तरीय पुरस्कारां’नी गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed