भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय:निवडणुका झाल्यावर देश संकटात असल्याचे समजले का? संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-18t105017392_1779081670.jpg




शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावरून त्यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. तसेच भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय लागली असल्याची टीका केली आहे. तसेच देशावर संकट आले आहे हे पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यावर समजले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारसायकलवर कुठे तरी मंत्रालयात गेले होते आणि त्यासाठी पोलिसांनी संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतला. भाजीवाले, फूलवाले, पेपरवाले सगळ्यांना उठवले. फूटपाथवरून लोकांना चालूच देत नव्हते. हे मी माझ्या मनाचे सांगत नाही, लोकांनी समोर आणलेल्या गोष्टी आहेत. भाजपने या ढोंगी प्रवृत्तीमधून बाहेर पडले पाहिजे. राष्ट्र संकटात आहे हे त्यांना बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर समजले का? राष्ट्रांवर संकट वाढेल, गरीबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर समजले का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय झाली पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधींनी भाकीत केलेच होते, आम्ही सगळ्यांनी भाकीत केलेच होते की निवडणूक संपल्यावतर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचे बॉम्ब आपल्यावर टाकणार आहेत. आता मोदी कुठे आहेत? मोदी 7 यूरोपियन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. आम्हाला म्हणतात परदेशात जाऊ नका आणि स्वतः ते परदेशात आहेत. त्यांच्या मंत्र्यांचे दौरेही सुरूच आहेत. मोदी दोन दिवस दिल्लीत दोन गाड्या घेऊन फिरत होते. तुम्ही काय पंडित नेहरू आहात का? एक गाडी घेऊन फिरायला. त्यांना आता सवय झाली आहे, सुखाची आणि अय्याशीची. ते ढोंग करत आहेत. त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागलेली आहे. मोदींना आवाहन केले पाहिजे की ‘भारत की ओर चलो’ संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भाजपच्या पक्षात आहेत, त्यामुळे पक्ष श्रीमंत आहे. जनता गरीब आहे. त्यांना गरिबीविषयी चिंता वाटते, ही चिंता त्यानणू कुठून व्यक्त केली, नेदरलँडमधून. तिकडे त्यांचे स्वागत केले, मुली-बिली मुलं नाचत आहेत, ढोल वाजतायत वगैरे, कुठे नेदरलँडला. इथे या न.. तिकडे जाऊन काय नाचगाणी करत आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आवाहन केले पाहिजे की ‘भारत की ओर चलो’, पण तसे दिसत नाही. स्ट्रॅटजीचा भाग होता मग इराण-इस्राइलवर का तोंड उघडले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर कोणी टीका केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना बिनडोक म्हणत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हो आहोत आम्ही बिनडोक. किती दौरे करणार? स्ट्रॅटजीचा भाग म्हणून किती दौरे करणार? स्ट्रॅटजी काय फक्त पंतप्रधान यांचीच आहे का? आमची नसते का? तुम्ही केवळ पंतप्रधान आहात म्हणून स्वागत होत आहे. स्ट्रॅटजीचा भाग होता मग इराण-इस्राइलवर का तोंड उघडले नाही? स्ट्रॅटजीचा भाग होता तर मग ऑपरेशन सिंदूर का गुंडाळले? अमेरिकेच्या दबावाखाली? काल सुद्धा अमेरिकेने सांगितले आहे की अमेरिकेकडून स्वस्तात तेल घेण्याची मुदत आता वाढवून मिळणार नाही, असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed