अशोक खरातचा 52 कोटींचा महाघोटाळा:65 बनावट खाती अन् परदेशात पलायनाचा प्लॅन उघड, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-18t095855531_1779078598.jpg




नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा समोर आला असून, त्याने अटकेपूर्वी बनावट आणि बेनामी खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये म्हणून खरातने बँकिंग नियमांमधील 2 लाख रुपयांच्या मर्यादेची पळवाट शोधली होती. अवघ्या तीन महिन्यांत या बेनामी खात्यांमधून तब्बल 52 कोटी रुपये काढून पलायन करण्याचा त्याचा मोठा कट होता, अशी माहिती आता समोर येत आहे. कोपरगावच्या समता पतसंस्थेतून 65 बनावट खाती उघडून 4 दिवसांत 200 पेक्षा जास्त व्यवहरांद्वारे 52 कोटी रुपये काढून त्याचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन असल्याचे तपासतून उघड जाले आहे. या बनावट खात्यांमधून दोन महसूल आणि दोन आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावे तसेच चाकणकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांच्या नावाने खाती असल्याचे समोर आले आहे. 65 खात्यांमधून प्रत्येकी 1 लाख 99 हजार रुपयांचे व्यवहार या प्रकरणी आता केंद्रीय यंत्रणांकडून संबंधित खातेदारांची चौकशी सुरू असून एक मोठी मोडस ऑपेरांडी उघडकीस आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये वावी पोलिस ठाण्यात खरातने राजेंद्र जासूद आणि परबविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, जानेवारी ते मार्च या कालावधीत त्याला अटक होईपर्यंतच्या काळात तब्बल 52 कोटी रुपये काढण्यात आले. तपास यंत्रणांना आढळून आले की, 2 लाखांच्या मर्यादेची पळवाट शोधण्यासाठी अवघ्या 5 दिवसांत वेगवेगळ्या खात्यांमधून प्रत्येकी 1.99 लाख रुपये काढले गेले. एवढेच नव्हे तर एकूण 65 खात्यांमध्ये एकाच तारखेला प्रत्येकी 1 लाख 99 हजार रुपयांचे व्यवहार झाले असून ही सर्व खाती हाताळणारा आणि त्यांचा नॉमिनी स्वतः अशोक खरातच असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची केली होती तयारी पोलिसांकडून अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी खरातने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची तयारी केली होती. परदेशात असलेल्या आपल्या अनेक संपर्कांचा फायदा घेऊन तिथेच कायमचे स्थायिक होत पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा हा डाव होता, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed