अक्कलकोट येथे श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेला झाली सुरुवात:पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, हलगीच्या कडक आवाजात मिरवणूक
![]()
‘श्री चौडेश्वरी माता की जय’ च्या जयजयकाराने व पारंपरिक पद्धतीने ढोल- ताशांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही येथील ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीच्या तीन दिवसीय यात्रा महोत्सवास शनिवारी प्रारंभ झाला. हा यात्रोत्सव श्री ष.ब्र. जयग
.
चतुर्दशीनिमित्त सकाळी कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी मंदिर ते श्री शांतलिंगेश्वर हिरेमठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य मंदिरात सुहासिनींना अत्यंत श्रद्धेने प्रसाद वाटप करण्यात आला.
मिरवणुकीसमोर धनगर समाजाचे ढोल संघ आणि ग्रामीण भागातील चिट्ट हलगी संघाच्या सनईचा मधुर आवाज घुमत होता. डिजिटल फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीने अक्कलकोट शहर व संपूर्ण परिसर पुरता दुमदुमून गेला होता. या भव्य मिरवणुकीचे स्वागत ठिकठिकाणी सुहासिनी महिलावर्ग जलकुंभासह पंचरत्न आरती ओवाळून करत होत्या. देवीच्या पावन दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
हा भव्य यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री चौडेश्वरी देवी ट्रस्टीचे अध्यक्ष काशीनाथ कुंभारे व व्यवस्थापक शरणप्पा कुंभार, सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. शनिवारी अमावास्येनिमित्त पहाटे श्रींची विशेष पूजा व आरती वैदिकत्वात भक्तिभावाने करण्यात आली. त्यानंतर भाविकांना नैवेद्य दाखविण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मंदिर दिवसभर खुले ठेवण्यात आले होते. परंपरेप्रमाणे देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पहाटे पूजा; दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले
