43 लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारी:नातेवाईकांनाही अडकविण्याचा प्रयत्न, येवला तालुक्यातील महिला तक्रारीसाठी सरसावल्या‎

0
orig_new-project-2026-05-17t073259968_1778983433.jpg




प्रतिनिधी | लासलगाव विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर ३ दिवसात जवळपास ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी लासलगाव पोलिस कार्यालयात दाखल झाले आहेत. निफाड सोडून इतर तालुक्यातील महिला देखील आता तक्रारी दाखल करत आहेत. छोटे रोपटे लावले वटवृक्ष करण्याचा होता मंत्र दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महिला बचत गटाच्या सदस्यांचे अनेक ठिकाणी मोठे मेळावे घेतले जात होते. यामध्ये सचिव संजय बोराळे व पत्नी जयश्री बोराळे हे दोघे मिळून महिलांना आपण चांगले कार्य करत असल्याचे पटवून देऊन हे छोटे रोपटे लावले असून त्याचा वटवृक्ष करणार असल्याचे आश्वासन देत होते. मात्र शेकडो महिलांची फसवणूक करून पळून गेलेल्या दांपत्याला पोलिसांनी शोधून काढावे, अशी मागणी महिलांकडून जोर जोर धरत आहे. दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शेकडो महिलांची फसवणूक केली गेली आहे. यामध्ये संस्थेचा सचिव संजय बोराळे व त्याची पत्नी जयश्री बोराळे यानी आपली बहीण, मेव्हणा, साडू यांच्यासह अन्य नातेवाईकांना देखील यामध्ये सहभागी करून त्यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये देखील प्रचंड चीड निर्माण झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed