नसरापूर अत्याचारप्रकरणी 14 दिवसांत 1100 पानी दाेषाराेपपत्र काेर्टात दाखल:मुख्यमंत्र्यांकडून दरराेज आढावा, शंभरहून अधिक फुटेजची तपासणी
![]()
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना एसआयटीने तातडीने तपासाची चक्रे फिरवत १४ दिवसांत तपास पुर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ११०० पानांचे दोषारोप
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये एसआयटीने सलग १२ दिवस रात्रंदिवस तपास केला. अॅड. मिसर यांनी तपासी पथकासोबत समन्वय साधत तांत्रिक पुराव्यांची भक्कम मोट बांधली. त्यासाठी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे हे दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे.
उच्च न्यायालय आदेशान्वये विशेष न्यायालयात सुनावणी
या गुन्ह्याची तीव्रता आणि समाजातील संताप पाहता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका विशेष न्यायालयात हा खटला चालवला जाणार आहे. येत्या सोमवार (१८ मे) खटल्याची नियमित सुनावणी सुरू होत आहे. अवघ्या १४ दिवसांत सखोल तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. अॅड. मिसर यांच्या अनुभवाचा या खटल्यात मोठा फायदा होणार असून पीडितेला लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
