मनपातील पराभव, गटबाजीमुळे शिंदेसेनेची कार्यकारिणी बरखास्त:संपर्क प्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांच्या भेटी; नंतर नव्या नियुक्त्या‎

0
240_17788442046a07022ca1c6b_15shivsena.jpg



महापालिका निवडणुकीत झालेला दारूण पराभव, एकाच जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्यानंतर वाढलेली गटबाजी आदींमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लोकसभा संपर्क प्रमुखांकडून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भे

.

मूळ शिवसेनेसह अन्य पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी सन २०२२मध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासूनच पक्षांतर्गत वाद सुरू झाले. प्रारंभी दोन जिल्हा प्रमुख, एका महानगराध्यक्षसह अन्य पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. नंतर मे २०२५मध्ये ग्रामीण भागासाठी आणखी दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. परिणामी प्रकरण नेत्यांच्या फोटोंची जाळपोळ व पोलिसांपर्यंतही पोहोचले होते. त्यानंतर यंदा झालेल्या महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला केवळ ८० पैकी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतरही पक्षात फेरबदल झाले नाहीत. अखेर पक्ष सचिवांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले आहे. शिंदे गटात यापूर्वी अनेकांनी प्रवेश घेतला. मोठ्या पदांवरही वर्णी लावण्यात आली होती. यावरून शिंदे गटात नाराजी नाट्य रंगले होते. चार-चार जिल्हाप्रमुख, वेगळी महानगर कार्यकारिणी आदींमुळे अन्य पक्षातील जनाधार असलेल्या काहींनी ही कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने पक्ष संघटना बांधणीसाठी प्रयत्न व्हावेत, अशी अटच टाकली होती. सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी व्यवस्थेकडून अन्य पक्षातील जनाधार असलेल्या काहींना आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. यापासून पक्षातील नेत्यांना लांब ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाची बैठक झाली होती. बैठकीत महापालिका निवडणुकीत उमेदवारी कापण्यावरून काही पदाधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. पक्षात कोणतीच शिस्त नसून पराभव का झाला, आमचे तिकीट का कापले, चिंतन केव्हा करणार, असे एक ना अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचे समजते. तसेच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे १० बीएलएंची निवड झाल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या नेत्याने काही बएीलएंना फोन केल्याने काही जण अन्य पक्षाचे असल्याचे समोर आले होते.

पक्षांतर्गत कुरघोडी रोखण्याचे आव्हान

आयातांसाठी पक्षाबाहेरील टिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed