शिवसेना पक्षचिन्ह व धनुष्यबाणाच्या वादावर 30 जुलै रोजी सुनावणी:तुमच्या नेत्यांना माध्यमांत बोलण्यापासून रोखा, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला फटकारले

0
orig_new-project-2026-05-16t065026606_1778894477.jpg



शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ३० जुलैला होणार आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने ठाकरे गटाला अतिशय कठोर शब्दांत फटकारले. “आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन ‘सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण

.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून माध्यमांमध्ये कोर्टाच्या कामकाजावर व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाबाबत सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“तुम्ही कोर्टात घाई करता व बाहेर जाऊन कोर्ट निर्णय देत नाही अशी विधाने करता, हे खपवून घेतले जाणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी सुनावणी जुलैअखेरीस घ्यावी व कुणालाही अशी बेजबाबदार वक्तव्ये करता येणार नाहीत, अशी मागणी केली. त्यानुसार ३० जुलैची तारीख निश्चित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed