रुग्णवाहिका सेवा गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला प्रशिक्षण कार्यक्रम:'बीव्हीजी'च्या सहकार्याने पुण्यात मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

0
dc6c74e5-95d5-468f-87d7-8cc00354538b_1778849202476.jpg




भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवांच्या गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला ‘मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम’ पुण्यात यशस्वीरित्या पार पडला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि रुग्णकेंद्री बनवणे हा होता. या प्रशिक्षणातून प्रशिक्षित आणि प्रमाणित मूल्यांकनकर्त्यांची एक फळी तयार करण्यात आली आहे, जे देशातील विविध रुग्णवाहिका सेवांचे परीक्षण करून उच्च दर्जाची सेवा सुनिश्चित करतील. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. प्रसाद राजहंस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा संरचित प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे रुग्णवाहिका सेवांचा दर्जा उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारत सरकारच्या हेल्थ सेक्टर स्किल कौन्सिल (HSSC) रुग्णवाहिका सेवा प्रदाता मानांकन निकष समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनीही मार्गदर्शन केले. आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये व्यवहार्य, संवेदनशील आणि परिस्थितीनुरूप मूल्यांकन प्रणालीची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. गुणवत्ता हमी आणि सातत्यपूर्ण सुधारणांसाठी प्रशिक्षित मूल्यांकनकर्ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या या सत्रांमध्ये रुग्णालयपूर्व आरोग्य सेवांमधील मानकीकरण, कौशल्य विकास, गुणवत्ता सुधारणा, मूल्यांकन प्रक्रिया आणि क्षमता वृद्धी या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम देशातील रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेमध्ये गुणवत्ता हमी यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास, मानकीकरण आणि गुणवत्ता हमी अधिक सक्षम करण्यासाठी ‘बीव्हीजी’ सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे देशातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed