संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात सावे यांच्यासह 5 आमदार उतरणार:बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सहकाराचे राजकारण
![]()
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. यापूर्वी मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते. त्यामुळे मंत्री अतुल सावे यांच्यासह 5 आमदारांनी बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्यामुळे बँकाच्या निवडणुकीनिमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखा आहेत. या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले जाते. त्याचबरोबर या बँकेचे जिल्ह्यात 1 लाख खातेदार आहेत. बँकेच्या माध्यमातून कृषी कर्जाचे वितरण केले जाते. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांसाठी अर्थसाह्य केले जाते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांना मोठे महत्त्व आहे. बँकेचे संचालक असल्यास लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत हक्काचे मतदार मिळतात. भविष्यातील राजकारणासाठी राजकीय नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला महत्त्व देतात. महायुतीच्या 3 बैठका झाल्या आहेत. यामध्ये ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार नितीन पाटील आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या आहेत. महायुती म्हणून या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. आक्षेप आणि त्यानंतर सुनावणीनंतर उमेदवारीबाबत आणखी चर्चा केली जाईल, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत पाच आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये भाजपकडून अतुल सावे, अनुराधा चव्हाण, तर शिवसेनेकडून आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव निवडणुक लढवणार आहेत. यामुळे जिल्हा बँक महत्त्वाची… 1999च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे दिवंगत रामकृष्ण बाबा पाटील यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी पाटील यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारलेला नव्हता. त्यांची जिल्हा बँकेच्या राजकारणावर मजबूत पकड होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस होती. त्याच काळात पक्षाने ‘एक व्यक्ती एक पद’ हे सूत्र स्वीकारले होते. त्यावेळी रामकृष्ण बाबा पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या विरोधकांनी निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांना बँकेच्या पदाचा राजीनामा द्यायला लावला. परिणामी त्यांची जिल्ह्यातील मतदारांवरील पकड ढिली झाली. त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे बाबांचा पराभव झाला, असे मानले जाते. त्याचबरोबर 1997पासून जिल्हा बँकेचे संचालक असल्यामुळे संदीपान भुमरे यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याचे मानले जाते. ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार नितीन पाटील आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या आहेत. महायुती म्हणून या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. आक्षेप आणि त्यानंतर सुनावणीनंतर उमेदवारीबाबत आणखी चर्चा केली जाईल, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत पाच आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये भाजपकडून अतुल सावे, अनुराधा चव्हाण, तर शिवसेनेकडून आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव निवडणुक लढवणार आहेत. आघाडीसोबत चर्चा करून निर्णय घेऊ काँग्रेस आघाडीकडून याबाबत अजून बैठका झाल्या नाही. काँग्रेसच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आम्ही तयारी सुरू केली आहे. याबाबत सर्वाशी चर्चा करून निर्णय घेऊ. – किरण पाटील डोणगावकर, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस युतीच्या चर्चा सुरू मी 10 वर्षांपासून संचालक असल्यामुळे मला निवडणूक लढवता येत नाही. विलास भुमरे निवडणूक लढवतील. महायुतीची चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होईल का, याचीही चाचपणी सुरू आहेत. – संदिपान भुमरे, खासदार, शिवसेना
