वसमत – परभणी मार्गावर दरोड्याचा प्रयत्न:तिघे ताब्यात, चार घरफोड्या उघडकीस; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-12t16_1778582615.png




वसमत ते परभणी मार्गावर वसमत पासून काही अंतरावर दरोडेच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता १२ पहाटे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना वसमत शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरामध्ये एक शटर फोडून शेतकऱ्याची हळदीची चोरी झाली होती तसेच एक चारचाकी पिकअप वाहन सुध्दा चोरी गेले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवुन सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. पोलीस पथकास गोपनिय माहिती मिळाली की, पाच अट्टल दरोडेखोर जसविंदर सिंग उर्फ जस्सु चव्हाण, बादलसिंग चव्हाण, दिलीपसिंग चव्हाण, अजयसिंग चावरीया, व एक विधीसंघर्षग्रस्त बालक (सर्व रा. रेल्वे स्टेशन रोड वसमत) हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने वसमत परभणी महामार्गावर काटेरी फांदया आडवे टाकुन थांबले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, शिवाजी जालमीरे, हरिभाउ गुंजकर यांच्या पथकाने छापा टाकला. दरम्यान पोलिस आल्याचे लक्षात येताच दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून
खंजीर, मिरचीपुड, दोरी, रॉड जप्त केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी वसमत शहरातील ०३ व आखाडा बाळापुर शहरातील ०१ अशा एकुण ०४ घरफोड्या केल्याची व ०१ पिकअप वाहन चोरल्याची कबुली देवुन घेरफोडीमधील चोरलेले अदांजे ०३ लाख रूपयाची हळद, रोखरक्कम व सोन्याचे दागिने व चोरलेली पिकअप असा एकुण ०५ लाख रूपयांचा मुद्देमाल काढुन दिला. सदरचे चोरटे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed