Rohit Pawar Demands White Paper On Highway Land Acquisition

0
new-project-2026-05-12t113154384_1778565771.jpg


समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात मोठा संशयास्पद व्यवहार झाला असून, प्रकल्प अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि काही ‘भोंदूबाबां’ना याची माहिती कशी मिळते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवा

.

रोहित पवार म्हणाले की, भूसंपादनाची माहिती शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना आधीच असते. प्रकल्प सुरू होण्याच्या दोन-तीन वर्षांपूर्वीच या महामार्गांच्या परिसरात कुणी जमिनी घेतल्या, याचा तपास केला तर मोठे मासे गळाला लागतील, असेही ते म्हणाले.

भाजीला पाण्याची फोडणी देण्याचं संशोधन सुरू

रोहित पवार म्हणाले की, देशात सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागीरांची संख्या लाखोने असल्याने वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आवाहनाचा एकूणच सोनार व्यवसायासह या कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो. आजच्या महागाईच्या काळात जवळ पैसाच उरला नसल्याने सामान्य माणसाने त्याच्याकडील आहे तेच सोनं तारण ठेवल्याने नवीन सोनं घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसंच गेल्या दोन दिवसांपासून ज्या लोकांशी बोलणं झालं, चर्चा झाली त्यात लोकांचंच असं मत आहे की, पंतप्रधान मोदी साहेबांचं आवाहन हे व्यवहार्य आहे, असं वाटत नाही. राहिला प्रश्न तेलाचा… तर भाजीला पाण्याची फोडणी देण्याचं संशोधन सध्या सुरु आहे..! असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी कराव्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन आणि तेलात काटकसर करण्याचे आवाहन केले होते. यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली. सामान्य गोरगरिबांना काटकसरीचे धडे देण्यापेक्षा पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी. सरकारी कार्यक्रमात आकाशात विमाने उडवली जातात, त्यांना इंधन लागत नाही का? सत्तेतील आमदार चिथावणीखोर भाषणे देऊन रॅली काढतात, त्यांना पेट्रोल लागत नाही का? जनतेला उपदेश करण्यापूर्वी स्वतः कृती करून दाखवा, असा टोला त्यांनी लगावला.

..मुख्यमंत्री व्हायचे असेल तर सत्ता सोडावी लागेल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा काकींनी स्वतःची काळजी घ्यायला हवी होती, प्रोटोकॉल विभागाची चूक महाराष्ट्राला महाग पडली आहे. तसेच, सत्तेत राहून कुणी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते शक्य नाही. पुढच्या वेळी सत्ता आली तरी मुख्यमंत्री भाजपचाच होईल. जर कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर ही सत्ता आणि छानछोकी सोडून जनतेत उतरावे लागेल आणि भाजपविरोधात संघर्ष करावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता अजित पवार गटाला लक्ष्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed