आता 1.77 कोटी बहिणीच लाडक्या!:‘फिल्टर’ प्रक्रियेद्वारे राज्याच्या तिजोरीवरील वार्षिक 10 हजार कोटींचा भार वाचला

0
orig_new-project-2026-05-12t065110409_1778548917.jpg




‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी प्रशासकीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ई-केवायसी आणि प्रशासनाच्या कठोर छाननीमुळे तब्बल ६६ लाख बोगस आणि अपात्र अर्ज कायमचे बाद झाले. या एका निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा तब्बल १० हजार कोटींचा वार्षिक आर्थिक बोजा टळला आहे. या ‘फिल्टर’ प्रक्रियेनंतर आता केवळ १ कोटी ७७ लाख पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळेल. तांत्रिक कारणांमुळे रखडलेले मार्च आणि एप्रिल महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये याच आठवड्यात या पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत. बँक खात्याला आधार जोडणे आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलची मुदत दिली होती. खात्याशी आधार जोडलेले नसल्याने ज्यांचे पैसे रखडले होते, त्यांनी या मुदतीत आपली त्रुटी दूर केली. त्यामुळे फेब्रुवारीत लाभ मिळालेल्या १ कोटी ५७ लाख महिलांमध्ये त्रुटी दूर केलेल्या २० लाख महिलांची भर पडली असून अंतिम आकडा १.७७ कोटींवर स्थिरावला आहे. डेटा ऑडिटचा झाला लाभ योजनेच्या सुरुवातीला २ कोटी ४३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच या संपूर्ण डेटाच्या ऑडिटचे आदेश दिले. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. लाखो अर्जांमध्ये आधार कार्ड जोडलेले नव्हते, तर काही ठिकाणी एकाच कुटुंबातून अनेक जणींनी अर्ज भरल्याचे उघडकीस आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *