मुंबई पोलिसांची मोठी कारवाई:17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त, 12 जणांच्या आवळल्या मुसक्या

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-11t202737465_1778511502.jpg




मुंबई आणि ठाणे परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई सत्र राबवत तब्बल 17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबईतील वर्सोवा (अंधेरी) परिसरात अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने छापा टाकून 3.82 कोटी रुपये किमतीचे 765 ग्रॅम हेरॉईन जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे मीरा रोड परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 13 कोटी 61 लाख रुपयांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करून 10 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिरा रोड परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकला. 4 एप्रिल 2026 रोजी मिरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंग परिसरातील श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत 2 कोटी 66 लाख 17 हजार 280 रुपये किमतीचा 1 किलो 324 ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा अंमली पदार्थ तिचा पती अरबाज वकील कुरेशी याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 कोटींच्या ड्रग्जचा साठा हस्तगत या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि मुंबई, मिरा रोडसह गुजरातमध्येही धडक कारवाया केल्या. या मोहिमेत पोलिसांनी एकूण 10 आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून आतापर्यंत 6 किलो 773 ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज हस्तगत केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत 13 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमली पदार्थांव्यतिरिक्त, ‘एमडी’ तयार करण्यासाठी लागणारी 255 लिटर घातक रसायनेही पोलिसांनी जप्त केली असून, या कारवाईमुळे ड्रग्ज निर्मितीचे मोठे रॅकेट उध्वस्त झाले आहे. आरोपींना अटक या कारवाईत अरबाज कुरेशी, मोईज खान, अरमान राईन, सुनील यादव, मोहम्मद वसिम शेख, इरफान कुडीया, मोहम्मद अराफत अन्सारी, खालदा अन्सारी आणि आकाश यादव या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही यशस्वी मोहीम पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने या धडाकेबाज कामगिरीद्वारे तस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed