ज्योती जानोळकर विद्यालयाचा दहावीपरीक्षेचा यंदाही ९५ टक्के निकाल:वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे फलित
![]()
प्रतिनिधी | अकोला येथील स्वर्गीय ज्योती जानोळकर विद्यालयाचा दहावी परीक्षेत यंदाही ९५ टक्के निकाल लावत यशस्वी उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित मानले जात आहे. यंदाच्या निकालात कुमारी गौरी महादेव घटाळे हिने ९४.६०% गुणासह प्रथम क्रमांक मिळवला, कुमारी श्रावणी रामकृष्ण इंगळे ९२. ८० टक्के द्वितीय क्रमांक मिळवला. कु राशी रवींद्र गावंडे ९२% तृतीय जागृती विवेक इंगळे ९०.६०% चतुर्थ क्रमांक गौरव साहेबराव भालेराव ८८.८०% कुमारी दर्शना अतुल शेळके ८८.८८% व संपदा पांडुरंग इंगळे ८८.८८% यांनी पाचवा क्रमांक पटकावला. गेल्या ३० वर्षापासून उत्तम निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या या विद्यालयातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल मिळवून देण्यास विशेष भर दिला आहे जातो. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था व्यवस्थापिका प्रतिभाताई जानोळकर, संस्था सचिव व प्राचार्य प्रशांत जानोळकर, संस्था संचालिका स्मिता जानोळकर, मुख्याध्यापक डी. यु. लांडे व शिक्षक वृंदा तसेच आपल्या आई-वडिलांना देतात.
