प्रेरणादायी:गणिताच्या शिक्षकावर विविध क्षेत्रांतून प्रेम व्यक्त होत असल्याचे ‘परीसस्पर्श’ मधून दिसते

0
240_177832298369ff0e270a1e6_img20260509wa.jpg




श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयात तब्बल पस्तीस वर्षे विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देणारे प्राचार्य विवेक मोहोड यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘परीसस्पर्श’ हा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित करण्यात आला. हा सोहळा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात झाला. माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. के. एम. कुळकर्णी यांच्या हस्ते गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी डॉ. कुळकर्णी म्हणाले कि, गणिताच्या शिक्षकावर विविध क्षेत्रांतून भरभरून प्रेम व्यक्त होत असल्याचे ‘परीसस्पर्श’मधून दिसते आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्मिता शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. मीनल भोंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयाचे माजी प्राचार्य मुरलीधर भोंडे, डॉ. गोविंद कासट उपस्थित होते. श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयाच्या १९९४ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले भारत जमधडे यांच्या संकल्पनेतून हा गौरवग्रंथ साकारला. या कार्यात मुख्याध्यापक दिलीप सदार, प्राचार्य सुनील मुंदाने, प्राचार्य ममता वाडेगावकर तसेच मोहोड कुटुंबीयांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून केली. प्रकाशनप्रसंगी डॉ. के. एम. कुळकर्णी म्हणाले, ‘एखाद्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रकाशित होणारा ‘परीसस्पर्श’ गौरवग्रंथ हे उल्लेखनीय उदाहरण आहे. गणिताच्या शिक्षकावर विविध क्षेत्रांतून इतके भरभरून प्रेम व्यक्त होत असल्याचे या ग्रंथातून प्रकर्षाने जाणवते. गौरवग्रंथ वाचल्यानंतर विवेक मोहोड हे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असून त्यांचा मोठा चाहता वर्ग असल्याची जाणीव होते.प्रमुख पाहुणे डॉ. गोविंद कासट यांनी गौरवग्रंथावर भाष्य करताना सांगितले की, ‘समर्पित शिक्षक, विद्यार्थी-केंद्रित नेतृत्व’ ही गौरवग्रंथाची टॅगलाईन आदर्श शिक्षकाचे सर्व पैलू स्पष्ट करणारी आहे. विवेक मोहोड आणि भारत जमधडे यांची गुरु-शिष्य जोडी समाज व शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत उदाहरण आहे.’ डॉ. मीनल भोंडे म्हणाल्या, ‘शिक्षकांचे अनुभव, मित्रांची निरीक्षणे, आप्तस्वकीयांच्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी अशा विविध अंगांनी भारत जमधडे यांनी संपादित केलेला हा गौरवग्रंथ शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. हा ग्रंथ प्राचार्य विवेक मोहोड यांच्या जीवनप्रवासाचे प्रभावी दर्शन घडवतो.” प्रास्ताविकात भारत जमधडे म्हणाले, “समाज, शिक्षक आणि आई-वडील या तीन ऋणांपैकी शिक्षकांचे ऋण हे आई-वडिलांइतकेच महत्त्वाचे असते. त्या कृतज्ञतेच्या भावनेतून प्राचार्य मोहोड यांचे कार्य समाजासमोर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.” यावेळी माजी विद्यार्थी संजीव करांगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्राचार्य मोहोड यांच्या मातोश्री पुष्पा मोहोड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारत जमधडे आणि डॉ. वंदना जमधडे यांनी प्राचार्य विवेक मोहोड व त्यांच्या पत्नी रोहिणी मोहोड यांचा सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरव केला. याशिवाय गोविंद कासट मित्र मंडळ, डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. मुकुल भोंडे तसेच प्राचार्य मोहोड यांच्या मित्रपरिवारानेही त्यांचा सत्कार केला. या वेळी भारत जमधडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गाडवे यांनी केले, तर आभार प्रीती क्षीरसागर यांनी मानले. विविध शहरांतून प्राचार्य मोहोड यांचे स्नेही, आप्तेष्ट, सहअध्यायी शिक्षक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संजय करांगळे, सुनील भोंडे, संजय खोब्रागडे, पुरुषोत्तम काकडे, शशांक लावरे, प्रतीक कडू, हेमंत सातपुते, चेतन गाडे, नंदू गुल्हाने, रुद्राणी उघडे आदींनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांची कृतज्ञता पाहून धन्य झालो “पवित्र अशा शिक्षकी पेशात कार्यरत असताना शिक्षणरूपी वाढणाऱ्या रोपट्यास मी एक माळी बनून सिंचनाचे काम केले. आज त्याबद्दलची कृतज्ञता पाहून मी धन्य झालो. गौरवग्रंथ निर्मितीसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांनाच हा ग्रंथ मी समर्पित करतो, असे मत प्राचार्य माहोडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *