बिलासाठी ठेकेदाराला मागितली 15 लाखांची लाच:5 लाख स्वीकारताना PWD इंजिनिअरला कार्यालयातच अटक, जळगाव एसीबीची कारवाई

0
db-temp-cover-marathi-2026-05-09t174335927_1778328978.jpg




जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील थकीत बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे तब्बल १५ लाखांची मागणी करणाऱ्या योगेश अहिरे या ज्युनियर इंजिनिअरला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. शनिवारी भरदिवसा शासकीय कार्यालय परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काही विकासकामे पूर्ण केली होती. या कामांची बिले मंजूर करण्याची जबाबदारी ज्युनियर इंजिनिअर योगेश अहिरे याच्याकडे होती. मात्र, नियमानुसार हक्काचे बिल देण्याऐवजी अहिरेने संबंधित मक्तेदाराकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. कष्टाच्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने, तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीचा सापळा आणि कारवाई एसीबीच्या पथकाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पडताळणी केली. तपासात १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर तडजोडीनंतर पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये देण्याचे ठरले. शनिवारी दुपारी, जेव्हा जळगावमधील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परिसरात व्यवहार ठरला होता, तेव्हा एसीबीने आधीच सापळा रचला होता. योगेश अहिरेने जशी ५ लाख रुपयांची रोकड स्वीकारली, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. प्रशासकीय वर्तुळात खळबळ जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या PWD विभागात अशा प्रकारे वरिष्ठ दर्जाचा इंजिनिअर लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही यशस्वी कारवाई उपविभागीय अधिकारी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच विविध कामांमधील टक्केवारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असतो. आज थेट कार्यालयाच्या आवारातच ५ लाखांची लाच स्वीकारताना वर्ग-२ चा मोठा अधिकारी पकडला गेल्याने या विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. हे ही वाचा… पुण्यात 28 लाखांची लाच स्वीकारताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात:30 लाखांची मागणी, 28 वर तडजोड; 2 लाख ॲडव्हान्स पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वैशाली मुरलीधर तोटेवार (४९) आणि तिच्या खासगी हस्तकाला तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शनिवारी (२ मे २०२६) दुपारी मंगलदास रोडवरील पंचतारांकित हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर ही धडक कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागातील अधिकारीच एवढ्या मोठ्या लाचप्रकरणी जाळ्यात अडकल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed