सात वर्षीय मुलीसह विवाहित महिला बेपत्ता:मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल, शोध सुरू

0
8a387730-a3a0-48cb-925d-9fcbbb56af56_1778169743669.jpg




मोर्शी तालुक्यातील येरला येथून एक २८ वर्षीय विवाहित महिला आपल्या सात वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव अंकिता उमेश पंडागरे (वय २८) असून, तिच्यासोबत तिची सात वर्षांची मुलगी आर्या उमेश पंडागरे ही देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि तिचा पती उमेश पंडागरे यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात काही कारणांवरून वाद होत होते. २९ एप्रिल रोजी अंकिता घरातून कपडे, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन मुलीसह निघून गेली. पती उमेश पंडागरे रात्री कामावरून घरी परतले असता त्यांना पत्नी आणि मुलगी घरात नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस या महिला व बालिकेचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *