प्रमोद पोकळे यांची राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड:अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार, १६-१७ मे रोजी नागपूरमध्ये स्पर्धा

0
ad54b68c-20a1-4e52-b36c-4a57194e5794_1778170556482.jpg




महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेसाठी येथील हरहुन्नरी कलाकार प्रमोद पोकळे यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा १६ व १७ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रामटेक येथे होणार आहे. या निवडीसाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये स्थानिक छाबडा प्लॉट येथील ललित कला भवन येथे गटस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत प्रमोद पोकळे आणि त्यांच्या भजनी संघाने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. अतिरिक्त सहायक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे आणि अतिरिक्त कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही गटस्तरीय स्पर्धा पार पडली. यात एकूण ९ केंद्रांतील भजनी संघांनी भाग घेतला होता. बडनेरा नवीवस्तीच्या कामगार कल्याण केंद्रातील प्रमोद पोकळे यांच्या संघाने विजयाची परंपरा कायम राखत प्रथम क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या संघात मुख्य गायक म्हणून प्रमोद पोकळे आहेत. त्यांच्यासोबत तबलावादक प्रज्वल वांगे व निलेश रुमणे, पखवाजवादक निलेश बिरहा, वीणेकरी प्रवीण रुमणे यांचा समावेश आहे. टाळ आणि सहगायनासाठी राजेंद्र इंगोले, गणेश खंडार, सुभाष सुने, सुनील तायडे, राजेश टारपे, मनोज संभे, विजय दारोकार, प्रकाश बदुकले, प्रज्वल हिरडे व अरविंद अंबाडकर हे सदस्य आहेत. या निवडीबद्दल नगरसेवक प्रदीप हिवसे, चारुदत्त चौधरी, मंगेश मनोहरे, अजय लोंढे, भास्कर ढवळे तसेच संगीततज्ज्ञ प्रदीप गवळीकर, प्रा. मनोज विंचुरकर, विद्याताई जायले यांनी अभिनंदन केले आहे. अमरावती गटाचे अतिरिक्त कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण, केंद्र संचालक सचिन खारोडे, अजय पांडे, विद्या अंबाडकर, अमरदीप काळे, संजय खेन्ते, गजानन सोनटक्के, विनोद इंगळे, हरीश वैद्य, प्रमोद खडसे, श्रीकांत राठोड, संतोष कुकडे, विद्या बनारसे, मंदा कुरवाळे, नंदा भोवते, निलेश कुकडे, संजय चौधरी, राम अर्धापूरकर, अंकेश भगत आदींनीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *