'कॉर्पोरेट जिहाद'चे मास्टरमाइंड संभाजीनगरमध्येच:इम्तियाज जलील यांची चौकशी करा, निदा खान केवळ मोहरा, खरे सूत्रधार एमआयएमचे नेते- संजय शिरसाट
![]()
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची चौकशी झाली पाहिजे.त्या चौकशीतून एक मोठे षड्यंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निदा खान आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना जलील जाहीर पाठिंबा देतात. या सर्वांची बाजू घेऊन जलील यांना काय घडवायचे होते? ही लोकांच्या मनात शंका आहे. नाशिकची निदा खान संभाजीनगरमध्येच का आली? कॉर्पोरेट जिहादचे मास्टरमाइंडहे नक्कीच संभाजीनगरमध्ये आहेत म्हणून ती महिला शहरात आली. संजय शिरसाट म्हणाले की, धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे एमआयएमच्या महाशयांच्या नेतृत्वात होतात. निदा खान ही एक केवळ मोहरा आहे. त्यांचे जाळे महाराष्ट्रभर पसरलेले आहे. आपल्याला हे प्रकार नगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतील, हे विष पसरवले जात आहे. हिंदूचा द्वेष करणे, त्यांचे धर्मांतर करणे या प्रकरणामुळे समाजात चीड निर्माण होऊ लागली आहे. कालचे प्रकरण सुद्धा त्याच प्रकारचे होते. आता निदा खानला अटक करण्यात आली असून त्यामागे नेमके काय आहे हे समोर येईलच. पण या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्यात यावी ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. बेरोजगार मुलांकडे पैसा येतो कुठून संजय शिरसाट म्हणाले की, नाशिक कॉर्पोरेट जिहादचे मोहरे सोडा या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे, हे समोर आले पाहिजे. या प्रकरणाचे धागेदोरे फार लाबवर गेले असावे. वयात आलेल्या मुलांना ट्रेन करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडे कामधंदा नाही पण दीड दीड लाखांच्या दुचाकी आणि आयफोन आहेत आणि खिशात पैसे सुद्धा आहेत. हे नेमके कुठून येत आहेत, याचा सुद्धा तपास पोलिस यंत्रणेने केला पाहिजे. महिलांवर बलात्कारचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. संभाजीनगर अतिरेकी कारवायासाठी प्रसिद्ध संजय शिरसाट म्हणाले की, संभाजीनगर हे गेल्या अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायासाठी प्रसिद्ध आहे. त्या नारेगावचा जर भाग बघितला तर लक्षात येईल की तो परिसर कसा आहे. या जिल्ह्याला अनेक वेळा संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावे लागेल. निदा खान ही काही गर्भवती नव्हती. तिने अटक पूर्वक जामीन मिळावा म्हणून खोटी माहिती दिली.
