लिंबाळा तांडा शिवारात स्कार्पिओ वाहनावर टोळक्याचा हल्ला:मारहाण करत 6 तोळे वजनाची सोन्याची चैन पळविली, सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल

0
whatsapp-image-2026-04-25-at-93417-am_1777090947.jpeg




सेनगाव तालुक्यातील लिंबाळातांडा शिवारात 12 ते 15 जणांच्या टोळक्याने स्कार्पिओ वाहनाची तोडफोड करून सहा तोळे वजनाची सोन्याची चैन पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर शुक्रवारी ता. 24 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्याील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे त्यांच्या स्कार्पिओ वाहनाने नातेवाईकांच्या लग्नासाठी साखरा (ता. सेनगाव) येथे जात होते. शुक्रवारी ता. 24 रात्री ते साखरा येथे जाण्यासाठी निघाले असतांना लिंबाळा तांडा शिवारात चालकाने पाणी पिण्यासाठी वाहन थांबविले. यावेळी अचानक 10 ते 12 जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता वाहनावर काठी, लोखंडी रॉड मारले त्यामुळे वाहनाच्या काचा फुटल्या. त्यानंतर अशोक घुगे व इतरांना खाली काढून मारहाण केली. या मारहाणीत अशोक यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चैन जमावातील शंकर नवले (रा. सावंगा म्हाळसा) याने तोडून घेतले. त्यानंतर सर्व टोळके निघून गेले. या प्रकारानंतर घाबरलेल्या अशोक यांनी लिंबाळा येथे एका मित्राकडे काही वेळ थांबून त्यानंतर थेट सेनगाव पोलिस ठाणे गाठले. या घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना देण्यात आली. सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, जमादार पवन चाटसे, सुभाष चव्हाण, एकनाथ राठोड, जगन गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अशोक घुगे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी शंकर नवले, दामु नवले (रा. सांगवा म्हाळसा), पॉली व तर 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जमादार पवन चाटसे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed