नांदेडात कारने 2 दुचाकींना उडवून चालक पसार, 3 ठार:नियंत्रण सुटल्याने अपघात; मृतांत मायलेक, आत्या

0
orig_new-project-2026-04-24t062343942_1776991995.jpg




हदगाव तालुक्यातील हडसनी फाटा येथे बुधवारी रात्री उशिरा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. यामुळे एका दुचाकीवरील मायलेक व मुलाची आत्या असे तिघे जागीच ठार झाले. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले. घटनेनंतर कारचालक पसार झाला. कार अर्धापूरच्या शेख रिझवान शेख सलीमची असल्याचे पोलिसांनी सांगितले. हदगाव तालुक्यातील मानवत फाटा येथील रेखाबाई भाऊराव नरवाडे (४२) व त्यांचा मुलगा यशवंत भाऊराव नरवाडे (२३) हे दोघे मुदखेड तालुक्यातील टाकळगाव येथे रेखाबाई यांच्या भाचीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बुधवारी सकाळी गेले होते. वाढदिवस आटोपून मायलेक हडसनीकडे निघाले होते. परत येताना त्यांनी मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथील रेखाबाई यांची नणंद अनुसयाबाई बालाजी लोणाळे (४३) यांना सोबत घेतले होते. तिघे दुचाकीने येत असताना हदगावकडून तामसाकडे भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १२ केएन २५०९) दुचाकीला धडक दिली. या धडकेत रेखाबाई नरवाडे, यशवंत नरवाडे व अनुसया लोणाळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर कारने २० फुटांवर असलेल्या आणखी एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील राजवाडी येथील संतोष रायकर व मांजरवाडी येथील अविनाश मस्के हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आलो. अपघातग्रस्त कारपासून दोन्ही दुचाकी काही अंतरावर फेकल्या गेल्या होत्या. मृतदेह रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तातडीने मृतदेह बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. रुग्णवाहिका बोलवून जखमींना रुग्णालयात हलवले,असे हदगावचे सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांनी सांगितले. स्वाभिमानी संघटनेचे घेराव आंदोलन हडसनी फाटा येथे भरधाव वाहनांमुळे वारंवार होणारे अपघात आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंत्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. कारवर ओव्हरस्पीडिंगचे यापूर्वीचे चलान थकीत अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर कारवर ओव्हरस्पीडचे ३ हजार रुपयांचे दोन चलान थकीत आहेत. हिंगोली महामार्गावर कारने वेगमर्यादा ओलांडल्याने २ हजारांचा दंड करण्यात आला आहे. तसेच १ हजार रुपयांचे दुसरे चलान कारवर थकीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातस्थळापासून मृत मायलेकाचे हडसनी फाटा हे गाव ६ किमी अंतरावर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed