लातूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. जिल्ह्यातील टाका पाटीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तसेच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. लातूर जिल्ह्यातील टाका पाटीजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला. तुळजापूरहून औसाकडे जात असताना एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हे ही वृत्त वाचा

भंडाऱ्यात एसटीचा संतापजनक कारभार:दोन शाळकरी विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात अर्ध्या वाटेतच उतरवले; प्रवासी नसल्याचे कारण देत मनमानी!
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाचा एक संतापजनक कारभार भंडाऱ्यातील रोहा गावात समोर आला आहे. भंडारा ते मुंढरी असा प्रवास करणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनींना एसटी बसचे चालक आणि वाहकाने रात्रीच्या अंधारात अर्ध्या वाटेतच उतरवले. बसमध्ये इतर प्रवासी नसल्याचे कारण देत या मुलींना रोहा गावात सोडून देण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भंडारा येथून मुंढरीकडे जाणारी एसटी बस (एमएच 40 वाय 5008) रात्रीच्या वेळी रोहा गावात पोहोचली. त्यावेळी बसमध्ये केवळ या दोन विद्यार्थिनीच प्रवासी म्हणून शिल्लक होत्या. त्यांना पुढे मुंढरीला जायचे होते. मात्र, बसमध्ये इतर कोणीही प्रवासी नसल्याचे कारण पुढे करत, चालक आणि वाहकाने या दोन मुलींना रात्रीच्या मिट्ट अंधारात रोहा गावातच खाली उतरवले आणि बस पुढे न नेण्याचा निर्णय घेतला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed