
राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन डेप्युटी कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते कोणत्या जगात आहेत? असे देखील त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यां
.
सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या नसून हा सदोष मनुष्यवध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याला आत्महत्या का करावी लागली? त्याचे बिल का निघाले नाही? त्याला कोणते आमदार आणि मंत्री जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहात का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. सरकारच्या खात्यामध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये देखील नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील कंत्राटदारांची 80 हजार कोटींची बिले थकली आहेत. अनेक ठेकेदारांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे. तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे. तरी सुद्धा सरकारमधील तीन प्रमुख नेते मौज-मजा करत फिरत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. मंत्र्यांच्या लुटमारीमुळे राज्य अडचणीत आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजप आणि सरकार मध्येच नक्षलवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला गेले होते. तेथून त्यांनी शहरांमध्ये माओवाद, नक्षलवाद वाढला असल्याचे असल्याचे म्हणाले आहे. वास्तविक त्यांच्या पक्षात आणि सरकार मध्येच नक्षलवाद असल्याचा आरोप राऊत यांनी केला. येथे आमदार खुलेआम मारामारी करत आहेत, सरकारमधील आमदाराच्या भावानेच गोळीबार केला आहे. हा देखील नक्षलवाद असल्याचा राऊत यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हनी ट्रॅप हा देखील एक प्रकारचा नक्षलवाद असल्याचा ते म्हणाले. एवढे सर्व हे सुरू असताना तुम्ही गोड गप्पा, कोणाला बोलून दाखवत आहात? महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची बेअब्रू आहे, असा आरोप देखील राऊत यांनी केला.