आज गंगापूरला सहा, सोयगावला दोन मिरवणुका:पैठणला आकर्षक देखावा, ढोल-ताशे, झांज पथके वेधणार लक्ष, दिवसभर उपक्रमांची रेलचेल
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात जल्लोषमय वातावरण आहे. यंदा डीजेमुक्त मिरवणुका निघणार असून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. यात अभिवादन, रक्तदान शिबिर, पुस्तक वाटपाचा समावेश आहे.
.
पैठणमध्ये मुख्य मिरवणूक ४ तास सुरू राहणार आहे. यंदा डीजेमुक्त मिरवणूक असणार आहे, असे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध सांस्कृतिक व व्याख्याने कार्यक्रम तालुक्यातील जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश देणारा आकर्षक व वैचारिक देखावा सार्वजनिक भीमजयंती महोत्सव समिती, पैठण यांच्या वतीने साकारण्यात आला आहे. समाजाने बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी केलेले आवाहन काटेकोरपणे पाळावे यासाठी हा देखावा उभा करण्यात आला असल्याचे समितीचे अध्यक्ष किरण घाटविसावे यांनी सांगितले. पैठणचे कला शिक्षक गणेश गोजरे यांनी हा देखावा साकारला आहे. सोयगाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर व चौकात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सोयगावला डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथून सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक सुरू होईल. तसेच दुसरी मिरवणूक मातोश्री रमाई आंबेडकर कॉलनी येथून सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. एकूण ४७ गावांपैकी २४ प्रमुख गावांत मिरवणुका निघतील. खुलताबाद शहरात जयंतीनिमित्त काढण्यात येणारी भव्य मिरवणूक मंगळवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास जुन्या स्टेट बँक परिसरातून प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक जुने पोलिस ठाणे, बाजार गल्ली, फर्च मोहल्ला, वडाची आळी, जुने बसस्थानकमार्गे मार्गक्रमण करत रात्री सुमारे १२ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचेल. गंगापूर |कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभिवादन, रक्तदान शिबिर, पुस्तक वाटपाचा समावेश आहे. विविध सामाजिक संघटनांतर्फे शहरामध्ये सहा मिरवणुका निघणार असून उपनगराध्यक्ष अमोलदादा जगताप मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
