राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी:अंतिम सामन्यात पुणे विभागाचा पराभव करत पटकावले सुवर्णपदक
![]()
प्रतिनिधी |कसबे सुकेणे १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत निफाडच्या वैनतेय विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद मिळवले. नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सुवर्णपदकाला गवसणी घातली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत वैनतेयच्या संघाने उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागाचा, तर अंतिम सामन्यात बलाढ्य पुणे विभागाचा पराभव करत विजय संपादन केला. या विजयी संघाला विद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष खाटेकर, क्रीडा शिक्षक साहिल शेख आणि रूपेश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघात ईश्वरी पवार, वैष्णवी शिंदे, गौरी सोनवणे, कल्याणी ताडगे, ऋतुजा कुशारे, साक्षी ढेपले, पूजा सेंद्रे, सानिका भालेराव, प्रतीक्षा केदारे, तनुजा वाघचौरे आणि दिशा ढमे या खेळाडूंचा समावेश होता.
