Asha Bhosle Inaugurated 2009 Satara Literary Meet; Connected with Fans
![]()
2009 मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केले होते. त्यावेळी दीप प्रज्वलन करताना आशा भोसले शेजारी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील.
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे सातारा जिल्ह्याशी सर्वात खास नाते आहे. म्हणूनच 2009 साली महाबळेश्वरमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांची उपस्थिती हेच त्या संमेलनाचे मुख्य आकर्षण होते. शिवाय साहित्य
.
मी कधी कविता वाचायला गेले नाही. त्याच माझ्याकडे आल्या. त्यांना माझा आवाज आवडला. कवींनी माझे गाणे अन् लेखकांनी जीवन समृद्ध केल्याची भावना पार्श्वगायिका आशा भोसले यांनी महाबळेश्वरातील ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केली होती.
आशाताईंचे भाषण ठरले संमेलनाचे मुख्य आकर्षण
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये २००९ साली ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. आशा भोसले या संमेलनाच्या उद्घाटक होत्या. त्यांच्यामुळे ८२ व्या संमेलनाला वेगळी उंची लाभली होती. नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांना वारकऱ्यांकडून कडाडून विरोध झाल्यामुळे ते संमेलनाला फिरकलेच नव्हते. त्यामुळे उद्घाटनाचे भाषण हेच मुख्य आकर्षण होते. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, अनेक संकटे आली. मात्र या साऱ्यातून मता साहित्यानेच जगण्याचे बळ दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
कवी, साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यामुळेच मी समृद्ध झाले. कवींनी माझे गाणे तर लेखकांनी जीवन समृद्ध केले. मी कविता वाचायला गेले नाही. त्याच माझ्याकडे आल्या. त्यांना माझा आवाज आवडला, असे सांगत आशाताईंनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला होता. तसेच मी सातारा जिल्ह्याची सून असल्याचे सांगायलाही त्या विसरल्या नव्हत्या.
कराडमधील चोरे गाव आशाताईंचे सासर
सातारा जिल्ह्यातील चोरे (ता. कराड) हे आशा भोसले यांचे सासर आहे. मूळचे चोरे गावचे गणपतराव भोसले यांच्याशी आशा भोसले यांचा पहिला विवाह झाला होता. मूळ गाव सोडून गणपतराव भोसले हे चरेगाव (ता. कराड) येथे स्थायिक झाले होते. त्याठिकाणी त्यांची प्रॉपर्टी देखील आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात कोर्ट कचेऱ्या सुरू असताना पाच वर्षांपूर्वी आशा भोसले चरेगाव तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन गेल्या होत्या.
