नांदेड(प्रतिनिधी)-वीट भट्टीवर काम करणार्‍या कामगाराने 2 नोव्हेंबरच्या रात्री 2 वाजेच्यासुमारास आपल्या चार महिन्याच्या गर्भवती पत्नीचा गळादाबून खून केला. पोलीसांनी त्याला पकडून आणून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेवले. पण पोलीसांची नजर आपल्यावर नाही. हे पाहून त्या पत्नीला मारून टाकणार्‍याने पोलीस ठाण्यात आपल्या गळ्याला फाशी लावून आत्महत्या केली. पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन स्वतः यावेळेस नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बसून आहेत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार धनेगाव येथे वीट भट्टीवर कामगार असलेल्या सुशील महाजन हैबते (37) रा.मुदखेड याने आपली पत्नी छाया हैबते (30) हिचा रात्री २वाजता  गळादाबून खून केला. त्यानंतर एका नातलगाने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता सुशिल नव्हता आणि छाया काही बोलत नव्हती. मागील काही महिन्यापासून गरोदर असलेल्या छायासोबत सुशिलचे चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. याबाबत दिक्षा सुरेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुशील महाजन हैबते विरुध्द गुन्हा क्रमांक 1418/2026 दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरीतच  सुशील हैबतेला जवळपास 2 नोव्हेंबरच्या सकाळी 4 वाजता आपल्या ताब्यात घेतले आणि छायाचे प्रेत शासकीय रुग्णालतया रवाना केले. या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीणचे अत्यंत विद्वान पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर भोेसले हे करीत आहेत.

आज मनोज जरांगे पाटील आले होते, दुपारी न्यायालयात बॉम्ब असल्याचा ई मेल आला. त्यामुळे पोलीस विभाग हे सकाळपासूनच अत्यंत व्यस्त होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुपारी 4 वाजेच्या सुमारास सुशील हैबतेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातच स्वतःच्या गळ्याला फाशी लावून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. घटनेची महिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे हे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बसून आहेत. आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आपल्या देखरेखीमध्ये करुन घेत आहेत.


Post Views: 477










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search