पूर्णा नदीवर अडीच कोटीतून उभारणार घाट:आ. सावरकरांच्या हस्ते भूमिपूजन
![]()
म्हैसांग येथे पूर्णा नदीवर आमदार रणधीर सावरकर यांच्या अडीच कोटी रुपयांच्या विशेष विकास निधीतून घाट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पूर्णा नदीवर येतात. पूर्णा नदीवर दशक्रिया, अस्थी विसर्जन आदी विधी सुद्धा पार पडतात. भाविकांच्या मागणीची दखल घेत आ. रणधीर सावरकर यांनी नदीवर घाट उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे. घाट उभारुन हिंदू संस्कृती व परंपरा कायम राखण्यास मदत होणार आहे. धार्मिक परंपरा अविरतपणे सुरू राहावी, यासाठी आ. सावरकर यांनी दिशादर्शक कार्य केले आहे, असे प्रतिपादन सुरेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रशेखर गावंडे, मिलिंद देशमुख, मनोज देशमुख, रुपेश गावंडे, रामकृष्ण साटोटे, विजय देशमुख, अरुण देशमुख, राजेश बेले, अनिल गावंडे, प्रवीण हगवणे, चंदा लव्हाळे आदी उपस्थित होते.
