‘दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,’ असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. याच इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीराम फायनान्स व बजाज फायनान्स या दोन खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे जगणे कठीण झाले असताना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याचा आरोप तुपकर यांनी केला होता. त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत इशारा दिला होता की, ‘वसुलीवाल्यांनो, शेतकऱ्यांच्या दारात याल, महिलांना त्रास द्याल, तर कपडे काढून फटके देऊ! सरकारने वेळीच आवरावे, अन्यथा जोरजबरदस्तीने वसुली करणाऱ्या कंपन्यांचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही.’ शेतकऱ्यांच्या मृत्यूला वसुलीचा दबाव कारणीभूत नांदेडचे चंद्रकांत शिंदे आणि लातूरचे दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीचा दबाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांनी या दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. या दुर्दैवी घटनांनंतरच त्यांनी खासगी फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या जुलमी वसुली पद्धतीविरोधात आपली भूमिका अधिकच आक्रमक केली होती. राज्यात आंदोलन पेटण्याची शक्यता 2 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केल्याने आता मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि मायक्रो फायनान्स कंपन्या थेट समोरासमोर आल्याने हे आंदोलन संपूर्ण राज्यात पेटणार असल्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे. या घटनेमुळे रविकांत तुपकर यांनी दिलेल्या इशाऱ्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search