[ads1] बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर 40 वर्षे काढणे काही सोपी गोष्ट नाही. बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते. माझ्या घरात माझ्या जन्मापासून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कायम आहे हे मी पाहत आलो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत त्यांच्या बरोबरीने माझा प्रवास झाला आहे. मला बाळासाहेब ठाकरेंनीच प्रत्येक वेळी नोकरीला लावले आहे, पण माझा बंडखोर स्वभाव असल्याने ते चिडायचे, ते आमचे हेडमास्तर होते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी एखाद्या व्यक्तीवर चिडणे हे त्या व्यक्तीचे महत्त्व अधोरेखित करते, ते चिडले याचा अर्थ त्यांचा आशीवार्द आहे. बाळासाहेब ठाकरे माझ्यावर चिडले असतील तर तो माझा गौरव आहे. त्यांनी मला लिहायला शिकवले आहे. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी मला घडवले आहे. त्यासाठी आपल्या विद्यार्थ्याचा कान पकडावा लागतो त्यांचा तो अधिकार असतो त्यांनी तो गाजवला याचा मला आनंद आहे. सरकार लोकशाहीचे शत्रू संजय राऊत म्हणाले की, सरकार आणि सरकारने नेमलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाहीचे शत्रू आणि निर्लज्जपणाचा कळस असल्याने ते खूर्चीला चिटकून बसले आहेत, त्यांना धक्का द्यावा लागेल. म्हणून आज दिल्लीतील रामलीला मैदानावर संपूर्ण भारतामधून लोकं येत आहेत. त्यानंतर ज्ञानेश कुमारांच्या खूर्चीला धक्का देण्यासाठी इंडिया आघाडीचा एक मोर्चा होणार आहे. सरकारवर दबाव टाकण्याचे कार्यक्रम सातत्याने होत राहतील. देशात रावणलीला सुरू संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या टीकेला काही अर्थ राहिलेला नाही. देशात जी रावणलीला सुरू आहे त्याविरोधात आम्ही रामलीला मैदानाची निवड केली आहे. राहुल गांधी काय आहेत हे देशातील जनता ठरवेल. देशातील जनतेचा इतका उद्रेक असताना सुद्धा मोदी-शहा ज्ञानेशकुमार यांना पदावर कायम ठेवत आहेत. रावणाने सुद्धा असे कृत्य केले नव्हते. रावण हा विद्वाण होता, तो शिवभक्त, उत्तम प्रशासक आणि दशग्रंथी बाह्मण होता. ती लढाई सत्य आणि असत्याची लढाई होती. रामराज्य काय होते हे भाजपने समजून घेतले पाहिजे. राम राज्याच्या नावाखाली त्यांनी रावणराज्य निर्माण केले आहे, ते संपवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जण एकवटले आहोत. राम मंदिराच्या दानपेट्या चोरणाऱ्यांनी काही सांगू नये संजय राऊत म्हणाले की, आमची सेना ही प्रभु श्री रामांच्या प्रेरणेतून उभी राहिली आहे. ज्यांनी अयोध्या लुटली, प्रभू श्री राममंदिराच्या दान पेटीत चोरी केली त्यांनी आम्हाला रामकथा सांगू नये. दिल्लीतील रॅलीला शिवसेनेतर्फे मी आणि आमच्या पक्षाचे इतर नेते उपस्थित राहणार आहोत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या देखील त्यांच्या पक्षाकडून उपस्थित राहणार आहेत. मला उद्धव ठाकरे यांनी इथे पाठवले आहे. मुंबईत दुसरे काही काम सुरू आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुंबईत असणे गरजेचे आहे. आमचे सेनापती मुंबईत बसले आहेत त्यांनी आम्हाला सांगितले आहे की जायला पाहिजे. राहुल गांधी यांच्या तोडीची लढाई महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केली आहे. लहान व्यापाऱ्यांना हे सरकार घाबरवत आहे, त्यांना आमचा पाठिंबा आहे. हे ही वृत्त वाचा पाबे घाटात पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली:निसरड्या रस्त्यामुळे बंद पडलेली कार दरीत, तिघे जखमी तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघालेल्या पर्यटकांच्या कारचा पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि मदतीमुळे या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मोनीस अरविंद चव्हाडिया, रितिका सिंग आणि उमेश अशी कारमधील प्रवाशांची नावे आहेत. हे तिघे आज पहाटे हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी कारने निघाले होते. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ते पाबे घाट चढत असताना त्यांची कार अचानक बंद पडली. वाचा सविस्तर [ads2] What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मोदी म्हणाले- 12 वर्षांत 49 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले:देशातील आर्थिक असमानतेत वेगाने घट; 6 वर्षांत 13.4 कोटी रोजगार वाढले MBA विद्यार्थ्याने चोरले कारचे टायर:महिंद्रा थारला बनवायचा लक्ष्य; पोलिसांनी 15 चाके जप्त केली; हैदराबादमधील प्रकरण