Nashik IT Company Manager Arrested for Sexual Exploitation of Women
![]()
नाशिक शहरात एकीकडे अशोक खरात प्रकरणाची चर्चा गरम असतानाच, आता कॉर्पोरेट जगताची मान शरमेने खाली घालायला लावणारा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत कामाला असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणींचे लैंगिक
.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतील टीम मॅनेजर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा किळसवाणा प्रकार केला. करिअरमध्ये अडथळे आणण्याची किंवा नोकरीवरून काढून टाकण्याची भीती दाखवून या तरुणींना जाळ्यात ओढले जात होते. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम पायदळी तुडवत या तरुणींचा विनयभंग आणि मानसिक छळ करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना
या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, नाशिक पोलिस आयुक्तांनी तातडीने संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या शोषणाचे बळी ठरलेल्या मुलींची संख्या २० ते २५ च्या घरात असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यात ५ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी ५ पुरुषांना अटक केली असून, एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह
नाशिकसारख्या प्रगत शहरात आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आयटी हबमध्ये असा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले का? यामध्ये आणखी कोणा बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का? याचा तपास आता ‘एसआयटी’ करत आहे.
न घाबरता पुढे या: पोलिसांचे आवाहन
नाशिक पोलिसांनी पीडित तरुणींना धीर देत आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या छळाला ज्या मुली बळी पडल्या असतील त्यांनी संकोच न बाळगता तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तक्रारदार तरुणींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा…
भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडी:उद्या पुन्हा हजेरीचे आदेश; SIT पुन्हा ताबा घेणार, तपासाला वेग
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा…
