श्रीनाथ हायस्कूलमध्ये बालवाचक मेळावा‎:विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राबविला उपक्रम

0
240_177547177169d38c9bd1824_34355224695.jpg




येथील श्रीनाथ हायस्कूलमध्ये ‘रंग उधळूया वाचनाचे’ या संकल्पनेतून बालवाचक मेळावा व गौरव सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्याशी ओळख व्हावी, या उद्देशाने उपक्रम राबवला. इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध साहित्यकृती वाचल्या. त्यावर आधारित रसग्रहण केले. चर्चासत्र सादर केले. ययाती, पावनखिंड, एक भाकर तीन चुली, श्यामची आई, एक होता कार्व्हर, मृत्युंजय ही पुस्तके वाचली. छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रांचेही वाचन केले. उपक्रमाची संकल्पना श्रीकांत बांदल यांनी मांडली. मागील वर्षापासून उपक्रम सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पुस्तकांतील पात्रे, कथा, नीतिमूल्ये यांचे सादरीकरण केले. पायल शेळके, स्नेहा शेळके, आयशा पठाण, विहाण डोंगरे, सोहम राख, अंकिता गरड, कार्तिकी जाधव, गौरी तुपे, रेवती वडेकर, श्रावणी भावले, साक्षी इरतकर, श्रुती लबडे, हर्षदा जाधव, अक्षरा भोसले, आरती आहेर आदींचा सहभाग होता. प्राथमिक मुख्याध्यापक संतोष खराद उपस्थित होते. हायस्कूल विभाग प्रमुख सिकंदर थोरात उपस्थित होते. मिडल विभाग प्रमुख अनिल काकडे उपस्थित होते. सुनिल चितळे उपस्थित होते. सर्व बालवाचक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन गौरवी लांडगे, अक्सा शेख, अंकिता गरड, कार्तिकी जाधव यांनी केले. प्रास्ताविक समृद्धी बडे हिने केले. मोबाइलपासून दूर राहा, वाचनाची सवय लावा ः अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव पठाडे होते. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे प्रा. संतोष गव्हाणे यांनी वाचन संस्कृतीमुळे संस्कार, नीतिमूल्यांची जडणघडण होते, असे सांगितले. सशक्त नागरिक तयार होतात, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावे. वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed