मराठ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पडद्यामागे भाजपचे काही लोक किती भयंकर षडयंत्र रचत आहेत, हे सर्वच पक्षांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. आम्ही याचा संपूर्ण छडा लावणार आहोत. माझ्यावर खूनी हल्ले करायचे, मला बदनाम करायचे, याचा छडा आम्ही लावणारच,

.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपचा तपास अत्यंत खोलवर झाला पाहिजे. माझ्याकडे अजूनही बरीच महत्त्वाची माहिती येत आहे. या ऑडिओ क्लिपबद्दल हे सरकार नेमकी काय भूमिका घेते, ते आधी बघू द्या. यांनी जर ही क्लिप खोटी ठरवली, तर मग बघूच किती क्लिप खोट्या ठरवतात. मला नाही वाटत की ते ही क्लिप खोटी ठरवतील, आता पुढे काय होते ते बघूयात. माझ्याकडे अनेक गोष्टी आणि पुरावे आहेत, ते जर मी लोकांसमोर आणले तर हे लोक वेडे होतील.

राज्यभरातून वृक्षतोडीला तीव्र विरोध

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यभरातून कर्जत आणि भीमाशंकरमधील वृक्षतोडीला तीव्र विरोध होत आहे. झाडे तोडू नयेत, हेच सर्वांचे म्हणणे आहे. ज्या झाडांमुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो, ती झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी संपूर्ण राज्यातून विरोध व्हायला हवा. सत्ताधाऱ्यांची नियतच खराब झाली आहे, यावर आता कोणी काही करू शकत नाही. यासाठी सुद्धा पडद्यामागे काहीतरी काळेबेरे ठरले असणार. ‘झाडे तोडा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असेच सांगितले गेले असणार. मराठ्यांचे आंदोलन चिरडण्याचे काम जसे सुरू आहे, तशीच दडपशाहीची पद्धत प्रत्येक ठिकाणी सरकारकडून वापरली जात आहे.

..तर संपूर्ण महायुतीने कशासाठी बदनाम व्हावे

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकांनी यांच्याविरोधात उभे राहिले पाहिजे आणि वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सर्वांनी आपले पाठबळ दिले पाहिजे. उद्या दुपारी 12 वाजता आम्ही स्वतः तिथे जाणार आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या विनाशाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. एखाद्या प्रकल्पाच्या नावाखाली झाडे तोडण्याचा हट्ट धरला जात असेल, तर सरकारने सुद्धा त्याला विरोध केला पाहिजे. महायुतीमधील जर एकाच व्यक्तीचा ‘झाडे तोडावीत’ असा आग्रह असेल, तर संपूर्ण महायुतीने कशासाठी बदनाम व्हावे, असा थेट सवालही जरांगे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वृत्त वाचा पत्नीला नांदायला पाठवण्याच्या कारणावरून वाद:जळगावात बहिणीच्या नवऱ्यानेच केला 21 वर्षीय मेहुण्याचा खून, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात एका कौटुंबिक वादातून बहिणीच्या नवऱ्याने 21 वर्षीय मेहुण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिन्याभरापासून माहेरी आलेल्या पत्नीला नांदायला पाठवा, या मागणीसाठीच्या बैठकीत हा वाद विकोपाला गेला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीसह त्याचे आई-वडील, भाऊ, काकू आणि चुलतभाऊ अशा सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सनी विनोद डोळे (वय 21, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत मेहुण्याचे नाव आहे. वाचा सविस्तर

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin