[ads1]
![]()
ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. पंकज त्रिपाठी अशा कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांनी कोणत्याही फिल्मी पार्श्वभूमीशिवाय स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावातून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत पोहोचलेल्या पंकज यांनी चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकांपासून सुरुवात केली आणि सध्या ते हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. पंकज यांच्या आयुष्याशी संबंधित एक भावनिक किस्सा अभिनेते मनोज वाजपेयी यांच्याशीही जोडलेला आहे. पंकज यांनी मनोज यांच्या चक्क चपला स्वतःजवळ ठेवल्या होत्या. चित्रपटांमध्ये ओळख निर्माण करण्यापूर्वी पंकज त्रिपाठी पाटणा येथील हॉटेल मौर्यच्या स्वयंपाकघरात सुपरवायझर म्हणून काम करत होते. ते हॉटेलमध्ये काम करण्यासोबतच थिएटरही करत होते. पंकज यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते की, ते मनोज वाजपेयींचे खूप मोठे चाहते होते. जेव्हा त्यांना कळले की मनोज वाजपेयी हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेव्हा त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते की मनोज वाजपेयींच्या रूममधून कोणतीही ऑर्डर आल्यास त्यांना थेट कळवावे. जेव्हा मनोज यांच्या खोलीतून ऑर्डर आली, तेव्हा पंकजने हॉटेलमध्ये असलेल्या अनेक सफरचंदांमधून सर्वात चांगले सफरचंद निवडले आणि त्यांना व्यवस्थित पॅक करून अभिनेत्याच्या खोलीत पाठवले होते. यासोबतच त्यांनी वेटरला सांगितले होते की, मनोजजींना सांगा की एक मुलगा त्यांना भेटू इच्छितो आणि तो थिएटर करतो. यानंतर पंकज स्वतः मनोजच्या खोलीत पोहोचले. त्यांनी मनोज यांना नमस्कार केला, पाय धरले आणि सांगितले की, ते देखील थिएटर करतात. त्यानंतर काही वेळाने ते तेथून परत आले. मनोज यांची चप्पल हॉटेलमध्ये राहिली होती पंकज यांनी सांगितले होते की, दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज वाजपेयी हॉटेलमधून चेकआउट करून विमानतळासाठी निघाले. मात्र, मनोज यांची एक हवाई चप्पल हॉटेलच्या खोलीत राहिली होती. त्यानंतर हाऊसकीपिंगच्या कर्मचाऱ्याने पंकजला सांगितले, “तुमचे मनोज वाजपेयी चप्पल विसरून गेले आहेत.” हे ऐकताच पंकज म्हणाला की, चप्पल हाऊसकीपिंगमध्ये जमा करू नका, त्या मला द्या. यामागचे कारण सांगताना पंकजने सांगितले होते, “एकलव्याप्रमाणे मी यांच्या पादुकांमध्ये माझा पाय घातला तर…” हे बोलता बोलता पंकज शोमध्ये भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. पंकज यांच्या एक नव्हे तोन जन्म तारखा पंकज त्रिपाठींच्या जन्म तारखेचाही एक रंजक किस्सा आहे. कागदपत्रांमध्ये आणि अनेक अधिकृत प्रोफाईल्समध्ये त्यांची जन्मतारीख 5 सप्टेंबर 1976 अशी नोंद आहे. मात्र, पंकज यांनी स्वतः सांगितले होते की, त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1976 रोजी झाला होता. त्यांनी सांगितले होते की, लहानपणी शाळेत नाव नोंदवताना त्यांच्या भावाला जन्मतारीख विचारली होती. भावाला नेमकी तारीख आठवत नव्हती, म्हणून 5 सप्टेंबर नोंदवली गेली. त्यामुळे हीच तारीख त्यांची जन्मतारीख बनली. पंकज त्रिपाठी यांनी भोगला 7 दिवस तुरुंगवास कॉलेजच्या दिवसांत पंकज त्रिपाठी यांना तुरुंगाचा अनुभवही आला होता. सन 1993 मध्ये ते विद्यार्थी राजकारणाशी संबंधित होते आणि एका आंदोलनादरम्यान त्यांना पाटणाच्या बेऊर तुरुंगात सुमारे सात दिवस काढावे लागले होते. मधुबनीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना राजकीय कैदी म्हणून तुरुंगात राहावे लागले होते. कारागृहात घालवलेल्या या सात दिवसांनी पंकज यांच्या विचारांवर खोलवर परिणाम केला. याच काळात त्यांना पुस्तके वाचण्याचा छंद लागला. कारागृहात बंद असलेल्या वेगवेगळ्या लोकांना आणि त्यांच्या स्वभावाला जवळून पाहण्याची संधी मिळाली, ज्याचा उपयोग त्यांनी नंतर आपल्या अभिनयात आणि भूमिका समजून घेण्यासाठीही केला. पंकज त्रिपाठीच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप पंकज त्रिपाठी यांना चित्रपटांमध्ये सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिका मिळाल्या. ‘रन’ आणि ‘ओमकारा’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर त्यांना २०१२ मध्ये आलेल्या अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून ओळख मिळाली. चित्रपटातील त्यांची सुलतान कुरेशीची भूमिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. यानंतर पंकज यांनी फुकरे, मसान, निल बट्टे सन्नाटा, बरेली की बर्फी, न्यूटन आणि स्त्री यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. ओटीटीवर सेक्रेड गेम्स, मिर्झापूर आणि क्रिमिनल जस्टिस यांसारख्या मालिकांनी त्यांची लोकप्रियता आणखी वाढवली. मिमीमधील त्यांच्या अभिनयासाठी पंकज त्रिपाठी यांना ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
[ads2]
पंकज त्रिपाठी कधीकाळी हॉटेलमध्ये करत होते काम:मनोज वाजपेयींची चप्पल घेतली होती ठेवून, आंदोलनामुळे 7 दिवस तुरुंगासही भोगला












Leave a Reply