[ads1]
![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातून एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ८३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची साखळी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून तीन हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची साखळी असा एकूण ८३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून, मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलीस हवालदार एस. गोंजारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आणि रविवार पेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने व रोकड चोरून नेण्याच्या अशाच काही घटना अलीकडे घडल्या आहेत. दुसऱ्या एका घटनेत, हडपसरमधील मांजरी परिसरात एका पादचारी महिलेकडील १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ५२ वर्षीय महिला मांजरी परिसरात राहतात. २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्या मांजरीतील झेड कॉर्नर परिसरातून पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच महिलेने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस कर्मचारी प्रदीप सोनवणे या घटनेचा तपास करत आहेत.
[ads2]
दगडूशेठ मंदिराजवळ महिलेचे दागिने चोरीला:83 हजार रुपयांचा ऐवज लंपास, विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
















Leave a Reply