नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन पत्नीसमवेत घरी परतत असताना बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून टाटा पंच कार नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४०, रा. सावरगाववाडी, ता. मुखेड) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्यांचे पती लक्ष्मण संभाजी गुट्टे (वय ५०) यांनी पोहत नदीपात्राबाहेर येत आपला जीव वाचवला. गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गुट्टे हे पत्नी पार्वती हे एमएच २६ सीवाय २६३५ क्रमांकाच्या टाटा पंच कार मधून नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. उपचारानंतर दोघेही कारने सावरगाववाडीकडे परतत होते. दरम्यान, बहाद्दरपुरा येथील मन्या नदीवरील पुलाचे कठडे तुटलेले असणारे अंधार ते लक्षात आले नसल्याने कार पुलावरून नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पार्वती गुट्टे यांचा बुडून मृत्यू झाला. लक्ष्मण गुट्टे यांना पोहता येत असल्याने ते नदीपात्राबाहेर आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश जुमडे आणि पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी पहाटे 3.30 वाजता पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात कोसळलेली कार बाहेर काढण्यासाठी आणि महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले.सकाळी 8 वाजताच्या सुमारास पार्वती गुट्टेसह कार नदीतून बाहेर काढण्यात यश आले.
उपचार घेऊन घरी परतताना कार नदीत कोसळली:पत्नीचा बुडून मृत्यू, पतीने पोहत वाचवला जीव; मन्याड नदीवरील दुर्घटना