![]()
महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या, सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत घेत, सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. “ज्या सरकारच्या काळात शेतकरी संकटात आहेत आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात ड्रग्सची प्रकरणे वाढत आहेत, त्यांच्यासोबत चहा पिणे आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्षाचे संकेत दिले आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; शेतकरी, बेरोजगारी, ड्रग्स प्रकरणांवरून हल्लाबोल
