![]()
भाजप खासदार निशिकांत दुबे मुंबई व महाराष्ट्राच्या मुद्यावर पुन्हा एका बरळलेत. बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश व झारखंड नसते, तर मुंबईने काय पाहिले असते? आम्ही राजे आहोत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डुबे डुबे करत मारेंगे या इशाऱ्यानंतर आपण 4 वेळा मुंबईत येऊन गेल्याचेही सांगितले. निशिकांत दुबे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना वरील विधान केले आहे. ते म्हणाले, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, बंगालचे लोक मुंबई व महाराष्ट्रात जातात. त्यानंतर तेथील लोकांना विशेषतः मुंबईतील लोकांना वाटते की, हे लोक आमच्या वाट्याचे घेत आहेत. बिहारी कब्जा करत आहेत असे त्यांना वाटते. पण आम्ही या देशातील सर्वात मोठे करदाते आहोत. मुंबई व महाराष्ट्र नसता तर कदाचित देश चालणार नाही, हेच अनेक वर्षांच्या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे. ही लढाई आहे. पण माझे म्हणणे आहे की, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश व छत्तीसगड नसते तर मुंबईने काय पाहिले असते? स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशातून कर गोळा करते. एलआयसी, सेबी, एनएसई कर देते. टाटाचे मुख्यालयही तिथे आहे. झारखंड नसते तर टाटा कधी टाटा बनले नसते. बिर्लाही नसते. या देशातील 40 ते 45 टक्के कोळसा व खनिज संपत्ती केवळ झारखंडकडे आहेत. आदी बिहारकडे होते, जेव्हा बिहार एकसंध होता. आम्ही याविषयी राजे आहोत. कराच्या जोरावर तुम्ही स्वतःला राजे समजता निशिकांत दुबे पुढे म्हणाले, आम्ही राजे आहोत, परंतु आमचे दुर्दैव असे आहे की, इथले वातावरण त्यांना सूट करत नाही. त्यामुळे सर्व लोकांनी आपली मुख्यालये मुंबईत बनवली आहेत. त्यांच्या कराच्या जोरावर तुम्ही स्वतःला राजे समजता. या लोकशाहीत जनता राजा आहे. ते मदत देतात म्हणून आम्ही निवडून येतो. गांधी – नेहरू घराणे राजे नाही. जी लढाई गांधी नेहरू कुटुंबासोबत आहे, तीच बाषा मी राज ठाकरेंना वापरली. निशिकांत दुबे यांनी यावेळी राज ठाकरे यांच्या धमकीनंतर मी 4 वेळा मुंबईला येऊन गेल्याचेही सांगितले. राज ठाकरेंनी गतवर्षी मला धमकी दिली. पण त्यानंतर मी 4 वेळा मुंबईला जाऊन आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही तिथे भेट घेतली, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या प्रचारसभेद्वारे निशिकांत दुबे यांचा समाचार घेतला होता. ‘दुबे, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात बुडवून मारू. महाराष्ट्रात येऊन कुणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दुबे यांनी राज यांच्या टीकेचा व्हिडिओ पोस्ट करत मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? असा उपरोधिक पलटवार केला होता.
भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले:म्हणाले – बिहार, झारखंड, मध्य प्रदेश अन् छत्तीसगड नसते, तर मुंबईने काय पाहिले असते?
