Sushma Andhare Alleges MPSC Exam Scam; Nagpur Center Controversy


“स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणारा आणखी एक महाघोटाळा राज्यात उघडकीस आला आहे. माथाडी कामगार निरीक्षक भरती 2026च्या निकालात अवाढव्य गैरप्रकार झाले असून इतर शासकीय परीक्षांमध्ये 2, 4 आणि 10 गुण मिळवणारे संशयास्पद व

.

पत्रकार परिषदेत अंधारे यांनी मूळ गुणपत्रिका, एक्सेल शीटचा डिजिटल मेटाडेटा आणि परीक्षा केंद्रांमधील तांत्रिक हेराफेरीची कागदपत्रे माध्यमांसमोर मांडत माथाडी निरीक्षक भरती तात्काळ रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची आग्रही मागणी केली.

परीक्षेचा पट आणि अस्वाभाविक आकडेवारी

अंधारे यांनी माथाडी कामगार निरीक्षक भरती प्रक्रियेचा घटनाक्रम मांडला. 12 मे 2026 रोजी 62 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. 11 जून 2026 पर्यंत अर्ज भरले गेले. एकूण 33,193 अर्जदारांपैकी 23,547 विद्यार्थ्यांनी 29 व 30 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष संगणकीय (CBT) परीक्षा दिली. संपूर्ण राज्यातून लाखो विद्यार्थी पुण्यात येऊन अभ्यास करतात. पुण्यातून केवळ 7 ते 8 विद्यार्थी निवडले जातात; मात्र नागपूरच्या केंद्र क्रमांक 8554 वरून 24 ते 26 विद्यार्थी अव्वल येतात. हे सर्व विद्यार्थी मूळचे नागपूर, तुमसर, भंडारा आणि गोंदिया पट्ट्यातील आहेत. एकाच केंद्रावरून इतक्या मोठ्या प्रमाणावर टॉपर्स येणे ही साधी गोष्ट नसून मोठा कट आहे.” अंधारे यांनी टॉपर्सच्या मागील परीक्षांमधील गुणांचा पाढाच वाचून दाखवला. प्रीती नावाची उमेदवार माथाडी निरीक्षक परीक्षेत 189.88 गुणांसह अव्वल; मात्र याच विद्यार्थिनीला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (CCI) वरिष्ठ लिपिक परीक्षेत 200 पैकी अवघे 4 गुण मिळाले होते. दर्पणला या परीक्षेत १९८ गुणांसह दुसरा क्रमांक (Rank 2); मात्र मुंबई महानगरपालिकेच्या (MCGM) सब-इंजिनिअर परीक्षेत 200 पैकी फक्त 10 गुण आणि महाजेनकोच्या परीक्षेत 60 गुण मिळाले. एका मागे एक बसलेल्या विद्यार्थ्यांना 193, 194, 198 असे हुबेहूब गुण कसे पडले? हा सामूहिक कॉपीचा प्रकार आहे की संगणक प्रणाली हॅक करण्याचा? असा सवाल त्यांनी विचारला.

अभ्यासक्रमाबाहेरील 24 प्रश्न आणि 48 गुणांची ‘विशेष कृपा’

“परीक्षेच्या अधिकृत अभ्यासक्रमात 52 कायद्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेत अभ्यासक्रमात नसलेल्या वेगळ्याच दोन कायद्यांवर तब्बल 24 प्रश्न विचारले गेले. 24 प्रश्न म्हणजे थेट 48 गुणांची आघाडी! इतर प्रामाणिक मुलांनी हे दोन कायदे वाचलेच नव्हते; मग नागपूर केंद्रावरील ठरावीक विद्यार्थ्यांनाच या दोन कायद्यांची माहिती आधीपासून कशी होती?”, असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला.

टीसीएसऐवजी ‘निधी चांदोरकर’ कोण?

निकाल प्रसिद्धीमधील तांत्रिक हेराफेरीवर बोट ठेवताना त्यांनी गंभीर तांत्रिक पुरावे सादर केले. “टीसीएसच्या (TCS) ऑटोमेटेड सर्व्हरवरून थेट निकाल प्रसिद्ध होणे बंधनकारक असते. मात्र, 6 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या पीडीएफच्या डिजिटल मेटाडेटामध्ये ‘निधी चांदोरकर’ असे ऑथरचे नाव दिसत आहे. खाजगी लॅपटॉपवर एक्सेल शीट बनवून हा निकाल पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्यात आला. ही निधी चांदोरकर कोण आहे आणि एका खाजगी व्यक्तीला शासकीय भरतीचा निकाल बनवण्याचा अधिकार कोणी दिला? सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे मूळ गुण प्रसिद्ध करून मग नॉर्मलायझेशन केले जाते. या परीक्षेत मात्र मूळ गुण लपवून थेट नॉर्मलाईज्ड गुण प्रसिद्ध करण्यात आले, जेणेकरून फेरफार लक्षात येऊ नये.

रिमोट ॲक्सेस आणि लॅब हॅकिंगचा संशय

नागपूरच्या वाडी येथील ‘आयडीझेड २’ लॅबमधील ठरावीक संगणक नोड्स आधीच राखून ठेवले होते का? ‘AnyDesk’ किंवा बाह्य सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केंद्राबाहेरून पेपर सोडवले गेले का? यासाठी त्या लॅबचे सीसीटीव्ही फुटेज, माऊस कर्सर ॲक्टिव्हिटी लॉग्स, सर्व्हर आयपी आणि डिजिटल ऑडिट ट्रेलची सायबर फॉरेन्सिक चौकशी झाली पाहिजे.

रोहित पवारांशी मतभेद नाहीत; निशाणा सरकारवरच!

पत्रकार परिषदेत विचारलेल्या इतर राजकीय प्रश्नांवरही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. “माझा आक्षेप रोहित पवार यांच्यावर कधीच नव्हता आणि नसेल. त्यांनी १२ दिवस आंदोलनस्थळी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी दाखवलेल्या जिद्दीला माझा सलाम आहे. प्रसारमाध्यमांनी अर्धवट चंक दाखवून आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही वैचारिकदृष्ट्या परिपक्व बहीण-भाऊ आहोत. माझा राग आंदोलक विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षली’ म्हणणाऱ्या भाजप आमदार विक्रम पाचपुते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवर आहे.”

बच्चू कडूंच्या ‘प्रसादा’वर टोला

“अमरावती शिक्षक मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांनी मतदारांपर्यंत ‘प्रसाद’ पोहोचल्याचे विधान केले. सत्ताधारी पक्षातील लोक असल्याने ते काहीही करू शकतात, त्यांना कोण विचारणार? तिकडे एकनाथ शिंदेंचा हनुमान म्हणवणारे बच्चू कडू आणि भाजपसाठी हनुमान चालीसा वाचणाऱ्या नवनीत राणा यांच्यातच सुरू असलेली जुंपली सर्व महाराष्ट्र पाहत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

————————————————

हेही वाचा…

सरकारविरोधात बोलणारा प्रत्येक जण देशद्रोही कसा?: 32 कोटी मतदारांची नावं कापून सरकारनेच केलाय खरा देशद्रोह; नाना पटोलेंचा हल्लाबोल

“केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांवर किंवा निर्णयांवर जर कोणी प्रश्न उपस्थित केले, तर त्याला थेट ‘देशद्रोही’ ठरवण्याची एककलमी मोहीम सध्या सत्तेत बसलेल्या लोकांनी चालवली आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांना धमकावणे, देश सोडण्याच्या नोटिसा बजावणे आणि लोकशाही मार्गाने होणारा विरोध मोडून काढणे ही हुकूमशाहीची लक्षणे आहेत. जर सरकारच्या विरोधात बोलणारा देशद्रोही असेल, तर मग जात आणि धर्माच्या आधारावर ‘एसआयआर’च्या (SIR) नावाखाली मतदार यादीतून 32 कोटी नागरिकांची नावे कापून मतदानाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेणाऱ्या या सरकारला काय म्हणावे? मुळात संविधानाची उघड पायमल्ली करून या सरकारनेच देशाशी खरा द्रोह केला आहे,” असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2026. All rights reserved. Theme Rubik News by Kantipur Themes