हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खापरखेडा परिसरात आज पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी भूगर्भातून आवाजासह सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता भूकंपमापक केंद्रावर २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
पहाटेच्या सुमारास भूगर्भातून आवाज होऊन धक्का जाणवल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली. मात्र, या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असून, प्राथमिक माहितीनुसार कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून या घटनेबाबत उपलब्ध माहिती देण्यात आली असून, परिस्थितीबाबत नागरिकांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.

Post Views: 7
