गृहमंत्री अमित शहांची नजर कमजोर अन् ते मानसिक दडपणाखाली:ज्ञानेशकुमार हे भाजपचे माफिया; आयोगात लेडी डॉन- संजय राऊत




जनता हुकुमशाही आणि ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत आहे. 2029 मध्ये पुन्हा भाजपचा विजय होईल हे अमित शहा यांच्या तोंडून ज्ञानेशकुमार बोलले असावे असे मला वाटते, ही ज्ञानेशकुमारची भाषा आहे. 12 कोटी नावे बेकायदेशीरपणे वगळली आहेत ती समाविष्ट करा आणि मग आमच्याशी बोला. अमित शहा यांची प्रकृती खराब आहे, ती बरी व्हावी या आमच्या शुभेच्छा आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा हे बऱ्याच काळानंतर प्रकट झाले आहेत, ते इतक्या दिवस भूमिगत होते. देशामध्ये इतके आंदोलन सुरू आहे, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम निवडणूक आयोगाने सुरू केले आहे त्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. जनतेच्या आक्रोशावर ज्यांनी आतापर्यंत तोंड बंद ठेवले ते गृहमंत्री अमित शहा काल प्रकट झाले अन् म्हणाले की सोमवारी झालेल्या मोर्च्यात 8 हजार लोकं होते. गृहमंत्र्यांची प्रकृती खराब आहे, त्यांची नजर कमजोर झाली आहे, ते मानसिक दडपणाखाली आहे. निराशेने त्यांना ग्रासल्याने त्यांना लाखोचा मोर्चा 8 हजारांचा दिसतो, त्यांची नजर कमजोर झाली आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली पाहिजे ही माझी सरकारला विनंती आहे. अडीच लाख पोलिस त्या दिवशी तैनात का करण्यात आले होते. जर 8 हजारांचा मोर्चा होता तर मग इतक्या पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यावर का उतरवले होते? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

..तर जंतरमंतरला टाळे का ठोकले? संजय राऊत म्हणाले की, 2029 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान तर अमित शहा हे गृहमंत्री राहणार नाही हे मी वारंवार सांगत आहोत. हे त्यांनाही माहिती असल्याने त्यांना एक प्रकारचे वैफल्य आले आहे. त्यांनी हे कधीच अपेक्षित केले नव्हते की लोकं दिल्लीत लाखोच्या संख्येने जमतील. जंतरमंतरला टाळे का ठोकले यांचे उत्तर अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी दिले पाहिजे. आमचे आंदोलन थांबणार नाही. आता वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. शहांच्या मते भाजपला मतदान न करणारे घुसखोर संजय राऊत म्हणाले की, ज्ञानेशकुमार एक दिवस जाणार हे आम्हाला माहिती आहे. अमित शहा यांना सुद्धज्ञ माहिती आहे की ते जाणार आहेत. निवडणूक आयोगाने अनेक सैनिकांचे आणि माजी अधिकाऱ्यांचे नावे मतदार यादीमधून वगळले ते काय घुसखोर आहेत का? याचे उत्तर अमित शहा यांनी द्यावे. जे भाजपला मतदान करत नाही ते घुसखोर आहेत असे अमित शहा यांना वाटते. ज्ञानेशकुमार माफिया संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयुक्तांना संरक्षण देण्यात आलेले नाही तर भाजपला निवडणूक घोटाळ्यात मदत करणाऱ्या माफियांना संरक्षण देण्यात आले आहे. ज्ञानेशकुमार माफिया आहेत तर निवडणूक आयोगात लेडी डॉन सुद्धा आहे. निवडणूक आयोगाला इतके कठोर संरक्षण देण्याची गरज संविधानाने कधीही केलेली नाही. अतिरिक्त संरक्षणामुळे शैतान निर्माण होतील असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *