14 वर्षांच्या मुलाचे अपहरण; अनैसर्गिक लैंगिक अत्याचार:दोघांवर चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल




एका १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून, त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (२६ जुलै) घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांत गणेश ढगे आणि अक्षय खरात या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, पीडित मुलावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलगा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. रविवारी दुपारी तो टपरीवर उभा असताना, आरोपींनी त्याला गाडीत बसवून त्याचे हात-पाय बांधले. रस्त्यात त्यांनी मुलाच्या मित्रालाही गाडीत घेतले, तर बहिणीलाही खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र ती पळून गेली. आरोपींनी दारू पिऊन वरुडकाजी जवळील एका बंद इमारतीत मुलांना नेले. तेथे त्यांना एकमेकांना मारायला लावून नंतर प्लास्टिकच्या बांबूने मारहाण केली. नारेगाव येथे नेऊन मुलालाही बळजबरीने दारू पाजण्यात आली. मित्राला तेथून पाठवून दिल्यावर दोन्ही आरोपींनी पुन्हा बंद इमारतीत नेऊन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले व त्याचा मोबाइल हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. एक महिन्यापूर्वीही केले होते अश्लील कृत्य आरोपी गणेश ढगे याने एका महिन्यापूर्वीही या मुलाला गोड बोलून बायपासजवळील एका हॉटेलजवळ नेले होते. तेथे त्याला जेवण देऊन त्याच्यासोबत अश्लील कृत्य केले होते आणि तुझा मर्डर करीन अशी धमकीही दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. ‘कुणाला काही सांगितले तर तुझा मर्डरच करेन’ ‘मी अगोदर मर्डर व हाफ मर्डर केला आहे, कोणाला सांगितलेस तर तुझाही मर्डर करीन,’ अशी धमकी देत आरोपींनी मुलाला ऑटोत बसवून दिले. मित्रांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आरोपी गणेश ढगे हा सराईत गुन्हेगार असून कायम नशेत असतो. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. सहा महिन्यांपूर्वी एकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तो तुरुंगात जाऊन आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *