पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप उद्या नांदेडमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकणार


दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी मांडण्याची संधी

नांदेड(प्रतिनिधी) : -नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेणार आहेत.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांना आपल्या तक्रारी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात, यासाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंतचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस प्रशासनासंदर्भातील आपल्या समस्या, तक्रारी अथवा अन्य अडचणी मांडण्याची ही संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी मंगळवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र यांच्याकडून करण्यात आले आहे.

नागरिकांच्या तक्रारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


Post Views: 59










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *