
गाडीचे दस्तऐवज व चालक परवाणा दाखवण्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या दोघांनी एका ट्रॅफिक पोलिसाला भर चौकात मारहाण केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या नालासोपारा भागात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर संतप्त प्
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील प्रगती नगरात मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. मंगेश नारकर व पार्थ नारकर अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही बापलेक आहेत. पार्थ नारकर हा आपल्या दुचाकीवरून प्रगती चौकातून पुढे जात होता. त्यावेळी तिथे तैनात हनुमंत सांगळे व शेष नारायण अत्रे या वाहतुक पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याकडे चालक परवाणा व इतर दस्तऐवजाची मागणी केली. पार्थकडे चालक परवाणा नव्हता. त्यामुळे त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्याने आपले वडील मंगेश नारकर यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले.
बापलेकाची पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
मंगेश नारकर यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांसोबत चर्चा करून प्रकरण समजून घेण्याची गरज होती. पण त्यांनीही त्यांच्याशी हुज्जत घातली. पोलिसांनी पुन्हा त्यांच्याकडे दस्तऐवजांचा आग्रह धरला. पण त्यांनी ते दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नियमांतर्गत योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला. यामुळे संतापलेल्या मंगेश नारकर व त्यांचा मुलगा पार्थ यांनी या दोन्ही पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ही घटना प्रगती नगरच्या मुख्य चौकात घडली. हा या भागातील वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे पोलिसांना मारहाण होत असल्याचे पाहून काही वेळातच तिथे मोठी गर्दी जमली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद झाला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या प्रकरणी नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे वसई – विरार शहरात वाहन चालकांकडून वाहतुक पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
खाली पाहा घटनेचा व्हिडिओ
परभणी शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस
दुसरीकडे, परभणी शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशक्ष हैदोस घातला आहे. शहरातील नागराज कॉर्नर व गोल घुमट परिसरात मोकाट कुत्र्यांनी मंगळवारी एका महिलेसह एका लहान मुलाच्या कानाचा लचका तोडला. त्यात हे दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात श्वानांची संख्या वाढली असताना महापालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
हे ही वाचा…
धावत्या लग्झरी बसमध्ये महिलेची प्रसूती:पण नंतर अचानक बाळाला बसबाहेर फेकले, पोलिसांनी पाठलाग करत बस रोखली; दोघे ताब्यात
परभणी – एका धावत्या खासगी बसमध्ये प्रसूती झाल्यानंतर एका महिलेने नवजात अर्भकाला बसमधून बाहेर फेकल्याची भयंकर घटना मंगळवारी सकाळी परभणी जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. हे दोघेही पती-पत्नी असल्याचा दावा करत आहेत. वाचा सविस्तर