INDIA Alliance MPs Protest; Dnyanesh Kumar Security Beefed Up In Delhi

[ads1]

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधातील विरोधकांच्या आंदोलनाचा आज सलग चौथा दिवस आहे. वृत्तसंस्था PTI ने सूत्रांचा दाखला देत सांगितले आहे की, INDIA आघाडीचे खासदार आज दुपारी ३ वाजता संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेणार आहेत.

सूत्रांचा दावा आहे की आणखी एक आंदोलन केले जाऊ शकते. विरोधी पक्षांचे खासदार सेवा तीर्थ, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती निवास, गृहमंत्र्यांचे निवासस्थान आणि पंतप्रधानांचे निवासस्थान यापैकी कोणत्याही एका ठिकाणी पोहोचू शकतात.

दुसरीकडे, गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाभोवती आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ सुरक्षा वाढवली आहे.

INDIA आघाडीच्या नेत्यांनी १० ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राष्ट्रपतींना पत्र देऊन भेटीची वेळ मागितली.

दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात आतापर्यंत ४ FIR दाखल करण्यात आलेत.

आंदोलनावर विरोधक, दिल्ली पोलिसांची तयारी

  • सूत्रांनुसार आजपासून 12 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत 23,000 सुरक्षा जवान तैनात केले जाऊ शकतात.
  • पोलिसांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाभोवती आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ सुरक्षा वाढवली आहे.
  • कुमार यांना सध्या Z-प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. त्यात दिल्ली पोलिसांचे 32 सुरक्षाकर्मी समाविष्ट असतात.
  • कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत दारूची सर्व किरकोळ दुकाने 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी बंद राहतील.
  • दिल्ली उच्च न्यायालय आज इंडियन यूथ काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करू शकते, ज्यामध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

आंदोलनाचे मागील 3 दिवस…

8 ऑक्टोबर- राहुल-प्रियांका यांनी राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहिली; खरगे म्हणाले- सरकार मतदानाचा अधिकार हिरावून घेत आहे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि SIRच्या विरोधात विरोधकांनी दिल्लीत गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले. राहुल-प्रियंका गांधी आणि INDIA ब्लॉकच्या खासदारांनी प्रथम कनॉट प्लेसमध्ये दुपारचे जेवण केले, त्यानंतर बसने राजघाट गाठले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. राजघाटावर सुमारे तासभर प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली. येथे खासदारांनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली.

७ ऑक्टोबर- राहुल तिसऱ्यांदा ताब्यात; म्हणाले- CEC यांची नियुक्ती बेकायदा, राजीनामा होईपर्यंत थांबणार नाही

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. यावेळी दोघेही जंतर-मंतरच्या २०० मीटर आधी रस्त्यावर बसले. सुरक्षा दलांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही, तेव्हा प्रियंका संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावर झोपल्या. दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी कार्यालयात जबरदस्तीने घुसल्याच्या आरोपावरून राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी खासदारांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आकाशवाणी कार्यालयाच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.

६ ऑक्टोबर- विरोधकांनी मोर्चा काढला, राहुल-प्रियंकांचा ८ तास ठिय्या, पोलिसांनी २ तास ताब्यात ठेवले

पहिल्या दिवशी इंडिया ब्लॉकच्या २०० हून अधिक खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता, मात्र त्यांना आधीच अडवण्यात आले. यानंतर राहुल आणि प्रियंका यांनी आकाशवाणी परिसरात ८ तास धरणे आंदोलन केले. यादरम्यान राहुल आणि प्रियंका यांना दोन वेळा ताब्यात घेण्यात आले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2026. All rights reserved. Theme Rubik News by Kantipur Themes