आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी डोळ्यांवर पट्टी बांधून अंधत्वाचा अनुभव घेतला. जागतिक दृष्टी दिनानिमित्त ‘हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन’ (एचटीबीएफ) च्या सहकार्याने ‘वॉक इन माय बूट्स’ पदयात्रेचे आयोजन केले होते. दृष्टी नसताना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश होता. या उपक्रमात एचटीबीएफचे २५ विद्यार्थी आणि आयआयएम नागपूरचे २५ विद्यार्थी व कर्मचारी स्वयंसेवक सहभागी झाले. डोळस विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. एचटीबीएफमधील एका विद्यार्थ्याने प्रत्येक स्वयंसेवकाला मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांनी त्यांच्या सूचनांवर विश्वास ठेवत आयआयएम परिसरात पदयात्रा केली. दृष्टीचा आधार नसताना चालणे, दिशा ओळखणे आणि सुरक्षितपणे वावरणे किती कठीण असते, याचा अनुभव त्यांना आला. सार्वजनिक ठिकाणी अंध व्यक्तींना सहज वावरता यावे यासाठी योग्य मार्ग आणि संवेदनशीलतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एचटीबीएफचे विश्वस्त जे. राधाकृष्णन यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. आयआयएम नागपूरच्या करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेसचे अध्यक्ष प्रा. शैलेंद्र निगम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रा. रंजिता जी. पी. यांचीही उपस्थिती होती.
आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांनी घेतला अंधत्वाचा अनुभव:‘वॉक इन माय बूट्स’ पदयात्रेतून डोळसांना अडचणींची जाणीव करून दिली