चार वर्षानंतर महापालिकेला आजपासून मिळणार नवे शिलेदार:विशेष सभेत महापौर, उपमहापौरांची होणार निवड, हात उंचावून घेतले जाणार मतदान‎



मनपाला चार वर्षांनंतर शुक्रवारी ६ फेब्रुवारीपासून महापौर व उपमहापौर मिळणार आहेत. गत चार वर्षांपासून मनपाचा कारभार हा प्रशासकांच्या हाती होता. आता मात्र, तो पदाधिकाऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यामुळे मनपातील ऐरणीचे मुद्दे, समस्या, रखडलेली विकास कामे मा

.

मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पीठासीन सभापती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेत स. ११ वाजता आयोजित विशेष आमसभेत महापौर, उपमहापौरांची निवड होणार आहे.या सभेत हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. या वेळी कोणकोणते गट सभेला उपस्थित, अनुपस्थित राहतात, याबाबत उत्सुकता तरी महायुतीचे सर्वच घटक पक्ष उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचप्रमाणे महाआघाडीतीलही सर्वच घटक पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कारण, सध्यातरी महायुती व महाआघाडीतील कोणत्याही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद नाहीत. महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर साहजिकच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे, गुलालासह फुलांची उधळण, मिठाईचे वाटप केले जाईल. महापौर, उपमहापौरांची मिरवणुकही काढली जाऊ शकते.

तत्पुर्वी शहराचे प्रथम नागरिक त्यांच्या कक्षातील आसनावर विराजमान होतील. महापौर, उपमहापौर पदासाठी आता सव्वा वर्षाचा फॉर्म्युला भाजप, वायएसपीने महापौर, उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित केला. भाजपचे श्रीचंद तेजवानी पहिल्या टर्ममध्ये, आशिष अतकरे दुसऱ्या टर्ममध्ये महापौर पदावर राहतील. वायएसपीचे सचिन भेंडे , अजय जयस्वाल सव्वा वर्षाच्या दोन टर्ममध्ये उपमहापौरपदी असतील. मतदानाच्या वेळी कोणत्या घडामोडी घडतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

स्थायी समिती सभापतीचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात अमरावती महानगर पालिकेत महापौर, उपमहापौर पदाचा गुंता सुटला असला तरी महानगर पालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीचे सभापती कोण या प्रश्नाचे उत्तर अजुनही मिळाले नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे तसेच नियमानुसार ( गटाच्या संख्याबळानुसार) त्यांचे दोन नगरसेवक स्थायी समितीत राहतील. महापौर भाजपचे, उपमहापौर वायएसपीचे असल्यामुळे स्थायी समिती सभापती पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते अशी चर्चा असली तरी अद्याप महायुतीने याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाचा निर्णय अजुनही गुलदस्त्यात आहे.

महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी ३ उमेदवार रिंगणात आहेत. महापौर पदासाठी भाजपचे श्रीचंद तेजवानी, काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते व बसपचे इस्माइल कासम लालुवाले शर्यतीत आहेत. उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या लुबना तनवीर, वायएसपीचे सचिन भेंडे, बसपचे सचिन वैद्य रिंगणात आहेत. महायुतीचे अर्थात भाजप २५, युवा स्वाभिमान १५, राष्ट्रवादी ११ शिवसेना शिंदे गटाचे ३ असे ५४ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते, बसपचे इस्माइल कासम लालुवाले यांना काँग्रेस १५, एमआयएम १२, बसप ३, शिवसेना उबाठा २, वंचित बहुजन पार्टी १ असे ३३ नगरसेवकांच्या बळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. बहुमतासाठी ४५ नगरसेवकांचे पाठबळ हवे. उपमहापौर पदाच्या शर्यतीतील महायुतीतील वायएसपीचे सचिन भेंडे यांनाही ५४ नगरसेवकांचे मत राहील. त्याचवेळी काँग्रेसच्या लुबना तनवीर, बसपचे सचिन वैद्य यांना ३३ नगरसेवकांचे मत मिळण्याची शक्यता आहे. अशात सध्यातरी महापौर, उपमहापौर पदासाठी महायुतीच्या उमेदवारांची दावेदारी मजबूत वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *