पैठण बसस्थानकावर कचराकुंड्यांचा अभाव; प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय:लक्ष देण्याची मागणी: आगाराकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष‎




पैठण शहरात दररोज हजारो भाविक संत एकनाथ महाराज यांची जन्म अन् कर्मभूमी असलेल्या या पवित्र नगरीत भाविक गंगा-गोदावरी स्नान, संत एकनाथ महाराज समाधी दर्शन, नाथ मंदिर, प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान आणि पैठणी साडी केंद्रासह ऐतिहासिक नागघाटाला भेट देतात. मात्र, या सर्व निसर्गरम्य व धार्मिक स्थळांची भ्रमंती केल्यानंतर बसस्थानकावर पोहोचणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावाला सामोरे जावे लागत आहे. प्रवासादरम्यान व बसची वाट पाहताना पर्यटक केळी, भुईमुगाच्या शेंगा, चिप्स, कुरकुरे व बिस्किटे यांसारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र, खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर कचरा टाकण्यासाठी संपूर्ण बसस्थानक परिसरात कुठेही कचराकुंडी उपलब्ध नाही. त्यामुळे कचरा कुठे टाकावा असा प्रश्न पर्यटकांसमोर निर्माण होतो. डस्टबिन न दिसल्याने पर्यटकांना बसस्थानकातील आडोशाचा आधार घेऊन तिथेच कचरा टाकावा लागत आहे. अशा प्रकारे उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *